लोकमत न्यूज नेटवर्क
कवठे एकंद : तासगाव तालुक्यातील कवठेएकंदला सरपंचपद सर्वसाधारण आरक्षण आल्याने सरपंचपदासाठी जोरदार चुरज निर्माण झाली आहे. निवडून आलेले सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या ग्रामविकास पॅनेलमधील इच्छुकांनी सरपंचपदासाठी फिल्डिंग लावली आहे. नऊ तारखेला सरपंचपद निवडी होणार असल्याने अंतिम टप्प्यात जोरदार खलबते सुरू आहेत.
या पदावर पुरुष सदस्यांना संधी मिळणार असे प्राथमिक अनुमान असला; तरी इच्छुकांच्या गर्दीमुळे वादावर तोडगा म्हणून महिला सदस्याला सुद्धा सरपंचपदाचा लाभ मिळू शकते. यामुळे सर्वसाधारण खुला आरक्षणामुळे सरपंच कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा आहे. यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. विरोधी पक्षांसह सर्व सदस्यांना निवड होईपर्यंत मार्केट आल आहे. या पार्श्वभूमीवर गटातटाचे राजकारण, अंतर्गत कुरघोड्यांमुळे वेगवेगळ्या चर्चांना उत येत आहे.
निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीला पराभूत करून शेतकरी कामगार पक्ष व भाजपच्या ग्रामविकास पॅनेलने १७ पैकी १३ जागा मिळवत बाजी मारली. ग्राम विकास पॅनलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आठ, तर भाजपच्या पाच जागा आहेत. सरपंचपद पहिली अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे तर नंतरची अडीच वर्षे भाजपकडे राहणार आहे. सरपंच आरक्षण सर्वसाधारण पडल्याने शेतकरी कामगार पक्षाकडील आठ सदस्यांपैकी एकाला संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाची खंड झालेली सरपंचपदाची धुरा दिली जाणार आहे.
चाैकट
नागाव कवठे सरपंचपद बिनविरोध
नागाव कवठे सरपंचपदासाठी इतर मागासवर्ग स्त्री असे आरक्षण आल्याने सत्ताधारी गटाकडून एकच महिला उमेदवार असल्याने सरपंचपद बिनविरोध होणार आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पॅनलकडील सुलताना मुलाणी यांची वर्णी सरपंच म्हणून लागणार आहे. उपसरपंच पदासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा असणार आहे.