शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात रंगणार काट्याच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:07 IST

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत.

ठळक मुद्दे तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचे धुमशान : कदम-देशमुख गटामध्ये पारंपरिक चढाओढनिवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार

प्रताप महाडिक।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत. बहुतांशी गावात काँग्रेस विरूद्ध भाजप असा अटीतटीचा सामना होणार आहे. परंतु काही ठिकाणी मात्र आघाड्यांचे राजकारण रंगणार आहे. निवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाºयांच्या, तर सत्ता खेचण्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात. त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता मिळवण्यासाठी आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेगाव तालुक्यात गावोगावी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी व परस्परविरोधी गटात चढाओढ आहे. या रणधुमाळीत उमेदवारीसाठी खुल्या प्रभागात चुरस, तर आरक्षित प्रभागात उमेदवारांचा शोध, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना गावपुढाºयांची कसोटी लागत आहे. सरपंचपदाचा उमेदवार संबंधित पक्षातील कार्यर्त्यांच्या एकमताने ठरविण्यावर नेत्यांनी अधिक भर दिला आहे. देवराष्ट्रे, तडसर, अमरापूर आदी गावात खुल्या गटातील सरपंचपदाने निवडणुकीला रंग भरला आहे. येथे काँग्रेस व भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे नाराजीतून बंडखोरी होऊ नये याकडे प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय चिन्हावर नसली तरी, तालुक्यात काँग्रेसविरोधात भाजप अशी काट्याची टक्कर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र सोनहिरा खोºयातील काही गावात भाजपच्या साथीने उमेदवार उभे राहतील.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या रणांगणात कदम व देशमुख हे दोन्ही राजकीय गट आपापली ताकद अजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची इमेज आणि विकास कामातील योगदानाचा प्रभाव पडणारच आहे. परंतु गावोगावी उमेदवाराचा प्रभाव, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, भावकीचे राजकारण यावरच सत्तेची गणिते ठरणार आहेत.आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घातले आहे. यामुळे गावोगावी अटीतटीची झुंज होणार हे निश्चित आहे. शिवसेना, शेतकरी संघटना, आरपीआय आदी पक्ष काही गावात काही जागा लढवून ताकद अजमाविण्याचा प्रयत्न करतील. काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी काँग्रेस व भाजप दोन्ही गटांनी कंबर कसली आहे.नेत्यांची प्रतिष्ठा पणालाआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वांगी, देवराष्ट्रे, नेवरी, शाळगाव आदी मोठ्या ग्रामपंचायतींकडे नेत्यांचे विशेष लक्ष आहे.बाहुबलींची हवा टाईटजनतेतून सरपंच निवड असल्याने जनमानसात झिरो आणि नेत्यांजवळ हिरो असणाºया काही बाहुबलींची ‘हवा टाईट’ झाली आहे. कोणी तरी कट्टप्पा धक्का देणार, या भीतीने अशा काही बाहुबलींना मैदानातून काढता पाय घ्यावा लागणार आहे.या ४३ गावांत होणार निवडणूक...आंबेगाव, अमरापूर, अपशिंगे, आसद, बेलवडे, भिकवडी (खुर्द), बोंबाळेवाडी, चिखली, देवराष्ट्रे, हणमंतवडीये, हिंगणगाव (बुद्रुक), हिंगणगाव (खुर्द), कडेपूर, करांडेवाडी, खांबाळे (औंध), खेराडे (विटा), खेराडे (वांगी), कोतवडे, कुंभारगाव, मोहित्यांचे वडगाव, नेर्ली, नेवरी, निमसोड, पाडळी, रायगाव, रेणुशेवाडी, सोहोली, सासपडे, शाळगाव, शिरगाव, शेळकबाव, शिवाजीनगर, सोनसळ, तडसर, तुपेवाडी, तोंडोली, उपाळे (मायणी), उपाळे (वांगी), वडीयेरायबाग, विहापूर, वांगी, येडे, येवलेवाडी या ४३ गावांत ग्रामपंचायत निवडणूक रंगणार आहे .