शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात राष्ट्रवादीला नगराध्यक्षांकडून कात्रजचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST

इस्लामपूर : शहरातील विकासकामांना विरोधही करायचा नाही आणि बहुमताच्या जोरावर तो मंजूरही होऊ द्यायचा नाही, असा डबल गेम खेळणाऱ्या ...

इस्लामपूर : शहरातील विकासकामांना विरोधही करायचा नाही आणि बहुमताच्या जोरावर तो मंजूरही होऊ द्यायचा नाही, असा डबल गेम खेळणाऱ्या राष्ट्रवादीला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बाजारमाळ येथील वाहनतळ आणि भाजी मंडईच्या विषयांवर कात्रजचा घाट दाखविला. राष्ट्रवादीची सूचना, उपसूचना आणि मतदानाची मागणीही फेटाळल्याने सभागृहात गदारोळ माजला.

मंगळवारी नगराध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. मुख्याधिकारी अरविंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. बाजारमाळ येथे वाहनतळ आणि भाजी मंडईचे बांधकाम करण्याचा विषय मंजूर आहे. त्याकरिता दोन कोटींचा निधी आला आहे. या कामासाठी १४ व्या वित्त आयोगातून ४ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याच्या विषयावर सभेत खडाजंगी झाली.

राष्ट्रवादीकडून संजय कोरे, विश्वास डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, डॉ. संग्राम पाटील, बशीर मुल्ला, सुनीता सपकाळ, प्रा. सविता आवटे यांनी या विकासकामांना विरोध नसल्याचे स्पष्ट केले. ३० कोटींचा प्रकल्प दोन कोटींच्या अपुऱ्या निधीतून करणे उचित ठरणार नाही. टप्प्याटप्प्याने होणारे बांधकाम व्यापारी आणि नागरिकांना त्रासदायक ठरेल. त्यामुळे शासनाकडून किमान ५० टक्के निधी आणून हे काम मार्गी लावावे, अशी भूमिका घेतली. सत्तारूढ गटाकडून विक्रम पाटील, वैभव पवार, अमित ओसवाल, शकील सय्यद, प्रदीप लोहार यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी केली.

राष्ट्रवादीच्या सदस्यांनी राज्य सरकारकडून निधी मिळवावा, असा चिमटा विक्रम पाटील यांनी काढला. शेवटी शहाजी पाटील व डॉ. संग्राम पाटील यांनी उपसूचना दिली. त्यावर नगराध्यक्ष पाटील यांनी ती फेटाळून लावली. त्यावर विश्वास डांगे यांनी ही उपसूचना मतदानाला टाकण्याची मागणी केली. नगराध्यक्ष पाटील यांनी तीही फेटाळली.

चौकट

नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, विषयपत्रिकेवरील मूळ विषय शासनाकडून आलेल्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. तो पालिकेच्या आणि शहराच्या आर्थिक विकासाचा आहे. त्यामुळे अधिनियमातील तरतुदीनुसार मतदानाची मागणी फेटाळून लावत आहे. १४ व्या वित्त आयोगातील ४ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी वाहनतळ आणि भाजी मंडईच्या बांधकामाकडे वर्ग करण्यास मान्यता देत आहे.