शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत गांजा तस्करांवर कर्नाटक पोलिसांचे छापे

By admin | Updated: February 22, 2016 00:01 IST

महिला ताब्यात : दोन संशयित फरार

मिरज : कर्नाटकातील बिदर परिसरात गांजाचा मोठा साठा पकडून गांजा तस्करांच्या शोधासाठी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापे टाकून एका महिलेस ताब्यात घेतले. गांजा तस्करी प्रकरणातील जुलेखा ऊर्फ जिल्ली व मुबारक हे दोघे फरार झाल्याची माहिती मिळाली. मिरजेत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री व तस्करी सुरू असून, मिरजेतून गोव्यासह अनेक ठिकाणी गांजा पाठविण्यात येतो. कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मिरजेत गांजाची आवक सुरू असून, रेल्वेस्थानक परिसर व खॉजा वसाहतीत गांजा तस्करांचे केंद्र आहे. चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील बिदर येथे मिरजेत गांजा नेणाऱ्या तस्करांना पकडून त्यांच्याकडून गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. हा गांजा मिरजेतील जुलेखा ऊर्फ जिल्ली या गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडे नेण्यात येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार कर्नाटक पोलीस मिरजेत दाखल झाले. सापळा रचून त्यांनी जिल्ली हिच्या घरावर छापा टाकला. मात्र, जिल्ली व तिचा मुलगा मुबारक हे फरार झाले होते. जुलेखा या महिलेस अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी यापूर्वी शिक्षा झाली आहे. कर्नाटक पोलिसांनी जिल्ली हिची मुलगी मदीना हिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांच्या छाप्याबाबत माहिती नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. मिरज रेल्वेस्थानक परिसर व खॉजा वसाहत परिसरात गांजाच्या किरकोळ विक्रीसह अन्य राज्यात आयात-निर्यात राजरोस सुरू आहे. मात्र, गांजा तस्करी करणारे अद्याप स्थानिक पोलिसांना सापडलेले नाहीत.