शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: December 13, 2015 01:08 IST

बुधगावमधील घटना : दगडफेक, डोळ्यात माती फेकली

सांगली : चोरीतील माल विकत घेणाऱ्या संशयितास पकडण्यास गेलेल्या कर्नाटक पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. दगडफेक करून व डोळ्यात माती फेकून पथकाला हुसकावून लावण्यात आले. बुधगाव (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रकचालक अनिल नाईक गेल्या आठवड्यात बेंगलोरमधून ट्रकमधून ट्रॅक्टरचे सुटे भाग घेऊन शिरोली (जि. कोल्हापूर) येथील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात निघाला होता. पाच लाखांचा हा माल होता, पण त्याने माल शिरोलीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयात नेलाच नाही. बुधगाव येथील एका भंगार विक्रेत्यास हा माल विकला. त्यानंतर तो गायब झाला. शिरोलीच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात माल न पोहोचल्याने त्यांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर चालक नाईक याचा शोध सुरु झाला. तो सोलापुरात असल्याची माहिती मिळाली होती. सोलापूर पोलिसांच्या मदतीने त्यास चार दिवसांपूर्वी पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून ट्रकही ताब्यात घेण्यात आला होता. चौकशीत त्याने बुधगाव येथील भंगार विक्रेत्यास माल विकल्याची कबुली दिली. हा माल जप्त करण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे पथक मोटारीने (क्र. केए ०३ एमडब्ल्यू) बुधगावमध्ये आले होते. पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, दोन हवालदार व ट्रान्सपोर्ट कार्यालयातील दोन कर्मचारी होते. संशयित नाईक यालाही सोबत आणले होते. त्याने दाखविलेल्या भंगार विक्रेत्याकडे पोलीस गेले. तेथे त्याच्या नातेवाईक महिला होत्या. त्यांनी पोलिसांना पाहून दंगा घालण्यास सुरुवात केली. पथकाने त्यांना गुन्ह्याची माहिती सांगितली. त्यानंतर भंगार विक्रेत्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांनी पथकावर दगडफेक सुरू केली. डोळ्यात माती फेकली. हा प्रकार सुरू असताना संशयित भंगार विक्रेत्याने तेथून पलायन केले. पोलीस बळ कमी पडल्याने पथक तेथून निघून गेले. पथकाने सायंकाळी पाच वाजता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची भेट घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार निरीक्षक जाधव यांनी चार पोलिसांची मदत दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कर्नाटक व ग्रामीणचे पोलीस पुन्हा बुधगावमध्ये दाखल झाले. त्यांनी भंगार विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला. मात्र दुकान बंद होते. त्याच्या घरीही शोधायला गेले होते. परंतु घराला कुलूप होते. त्याने हा माल घरी ठेवल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून संशयित भंगार विक्रेत्याचा शोध सुरू होता. मात्र त्याचा सुगावा लागला नाही. पथक त्याला ताब्यात घेण्यसाठी बुधगावमध्ये तळ ठोकून आहे. (प्रतिनिधी) परस्पर कारवाई : ग्रामस्थांची गर्दी कर्नाटक पोलिसांनी सुरुवातीला सांगली ग्रामीण पोलिसांची मदत घेणे गरजचे होते. पण त्याने तसे न करता ते परस्पर केले. त्यांच्यासोबत एक मराठी बोलणारी व्यक्ती होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. संशयिताच्या नातेवाईक महिलांनी हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पथकाच्या मोटारीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पुढील धोका ओळखून पथक तातडीने तेथून निघून आले. मध्यरात्री पुन्हा पथकाने ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन संशयिताचा शोध सुरू ठेवला होता. त्यांना केवळ माल जप्त करण्याची कारवाई करायची होती. चाळीस हजारांत माल ट्रकचालक अनिल नाईक याने पाच लाखांचा हा माल भंगार विक्रेत्याला केवळ चाळीस हजारात विकल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तो यापूर्वी बुधगाव येथे अनेकदा येऊन गेला आहे.