शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगिनी माई : कुसुमताई नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी म्हणजे अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या, वसतिगृहात आलेल्या मुलां-मुलींच्या, धरणग्रस्तांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, ...

क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी म्हणजे अण्णांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या, वसतिगृहात आलेल्या मुलां-मुलींच्या, धरणग्रस्तांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या, दुष्काळग्रस्तांच्या सर्वसामान्यांच्या माई होत्या.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या त्यांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करून त्यांचा सामाजिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेला त्यांनी कायम विरोध केला. मुलांच्या शिक्षणाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले. अन्याय, अत्याचार यातून स्त्रियांना मुक्त करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभा राहून स्वावलंबी झाले पाहिजे हा विचार घेऊन त्यांनी शिक्षणाचे कार्य केले. अविरत धडपड केली. त्यांच्या कार्याची

दखल घेऊन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने महाराष्ट्र सरकारने त्यांना सन्मानित केले.

पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी ज्यांनी आपल्या आचरणाने, विचाराने आणि कृतीतून प्रेरणा दिली त्यात क्रांतिवीर नागनाथ अण्णांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. त्या अण्णांच्या विचाराला माईंनी मोठी साथ दिली. त्या कायम सावलीसारख्या अण्णांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. संयुक्‍त महाराष्ट्राचा लढा, महागाई, रस्ते यासाठी लढा, साराबंदी चळवळ, शेतकरी संघटना, धरणग्रस्तांचा न्याय मागणीचा लढा, दुष्काळी भागासाठी पाण्याचा लढा, स्त्री मुक्ती चळवळ, दलित आदिवासी व ग्रामीण साहित्य संमेलने या सर्ब चळवळीमध्ये त्या अण्णांच्या बरोबर रणरागिणी म्हणून लढल्या.

हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाची निर्मिती मुळात संघर्षात झाली. त्या संघर्षांतही त्या रणरागिणी होत्या. सावली माणसाबरोबर फिरते त्याप्रमाणे पतीच्या सर्व संघर्षामध्ये व चळवळीमध्ये, सर्व कार्यात एकरूप झाल्या. शेवटपर्यंत त्यांचे हुतात्मा समूहावर बारकाईने लक्ष होते, मार्गदर्शन होते. अण्णांच्या निधनानंतर अण्णांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्याचा त्यांनी ध्यास घेऊन प्रयत्न केला.

अंधश्रद्धेविरुद्ध लढणे हा त्यांचा जीवनधर्म होता. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी शिकले पाहिजे, असा विचार माई सातत्याने मांडत. वाचनाची आवड, अभ्यासू, संयमी, काटकसरीची वृत्ती, नीटनेटकेपणा आणि स्वच्छता, उत्तम आरोग्य, श्रमाचे महत्त्व, स्वावलंबी वृत्ती, विचारांची व्यापकता, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याचा निरडपणा व पडेल ते काम करण्याची तयारी असे अनेक गुण माईंकडे होते. कर्तव्यसंपन्नतेच्या उत्तुंग आदर्श आपल्या वर्तणुकीतून बिंबवणारे व्यक्तिमत्त्व, खंबीर, अभ्यासू, कर्तबगार असे हे ‘मुक्‍त विद्यापीठ’ आचारसंपन्न होते.

कर्तव्यसंपन्नतेचा आदर्श आपल्या कृतीतून मांडणाऱ्या, सामाजिक प्रश्‍नांची अचूक जाण असणाऱ्या शिक्षणाबद्दल व स्त्रियांच्या उन्नतीसाठी अविरत परिश्रम करणाऱ्या पुरोगामी विचारांचा अंगीकार करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या विकासामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ‘कर्मयोगिनी’ माई होत्या.