शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कर्ण मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या करमरकरची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

स्पर्धेचे उद्घाटन जयंतराव पाटील खुले नाट्यगृह येथे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी नागेश ...

स्पर्धेचे उद्घाटन जयंतराव पाटील खुले नाट्यगृह येथे जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून ५०० स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेत पाच किलाेमीटर महिला गटात सायली कोकीटकर (गडहिंग्लज) यांनी प्रथम, श्रावणी कासार (राधानगरी) यांनी द्वितीय, तर अश्‍विनी जटार (बहादूरवाडी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत वर्षा कुलकर्णी (वय ६६) यांना विशेष पारिताेषिक देण्यात आले. ५ किलाेमीटर ४५ वर्षांपुढील पुरुष गटात पांडुरंग पाटील (कोल्हापूर) यांनी प्रथम. विश्‍वास चौगुले (कोल्हापूर) यांनी द्वितीय, तर मारुती चाळके (मलकापूर) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ५ किलाेमीटर १० ते ४५ वर्षे पुरुष गटात धनाजी चव्हाण (तासगाव) यांनी प्रथम, किरण बर्गे (कराड) यांनी द्वितीय, तर कार्तिक लोंढे (भिवघाट) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

१० किलाेमीटर ४५ वर्षांवरील पुरुष गटात रणजित करमरकर (बेळगाव) यांनी प्रथम, रवींद्र जगदाळे (सातारा) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला तर कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर (कोल्हापूर) व कैलास माने (कराड) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. १० किलाेमीटर १० ते ४५ वयाेगट पुरुष गटात परशुराम भोई (गडहिंग्लज) यांनी प्रथम, प्रवीण कांबळे (सांगली) यांनी द्वितीय, तर विशाल कांबिरे (सांगली) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी माणिक मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित साळुंखे, उपाध्यक्ष सुशांत मोरे, सचिव बिपीन राजमाने, उमाकांत कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट

प्रतीक पाटील यांचा सहभाग

‘कर्ण’ प्रतिष्ठानच्या वतीने भरवण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रतीक जयंत पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पाटील म्हणाले, मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची माझी इच्छा होती; पण काही कारणास्तव भाग घेता आला नाही. मात्र ‘कर्ण प्रतिष्ठान’ने ही इच्छा पूर्ण केली. पहाटे साडेपाच वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. काही अंतर धावून त्यांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

फाेटाे : ०८ इस्लामपूर १