शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

पाणी परवान्यासाठी कऱ्हाडला हेलपाटे

By admin | Updated: February 2, 2015 23:42 IST

पाटबंधारे खात्याचा कारभार : दुष्काळी भागातून विरोध, शेतकऱ्यांचे हाल

रजाअली पीरजादे - शाळगाव -दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आता कऱ्हाडला हेलपाटे मारावे लागणार आहेत. दुष्काळी भागातील सांगोला, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील तलाव, नदी, नाले ओढ्यावरील पाणी परवाने आणि इतर परवाने देण्याचे काम पाटबंधारे खात्याने कऱ्हाड, ओगलेवाडी येथील टेंभू कार्यालयाकडे १ जानेवारीपासून वर्ग केले आहेत. त्यामुळे आता टेंभू योजनेअंतर्गत आणि तलाव, नदी, नाले, ओढे यांचे कडेगावपासून सांगोल्यापर्यंतचे पाणी परवाने, ना-हरकत परवाने आणि इतर परवान्यांसाठी आता कऱ्हाड, ओगलेवाडी येथील टेंभू कार्यालयाकडे लोकांना हेलपाटे मारावे लागणार आहेत.यापूर्वी हे परवाने सांगली, तासगाव आणि विटा येथून लोकांना मिळत होते. परंतु आता टेंभू योजना सुरू झाल्याने आणि त्याचे पाणी आता कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांना मिळू लागल्याने आणि हे पाणी सांगोला तालुक्याला काही दिवसांनी मिळणार असल्याने टेंभूने पाणी ज्या गावांना मिळणार आहे, अशा सर्व गावांचा एकत्रितपणे मसुदा तयार करून एकाच छत्राखाली किंवा कार्यालयाखाली आणण्याच्या दृष्टीने शासनाने सर्व कारभार आता टेंभू योजनेच्या कऱ्हाड येथील ओगलेवाडी कार्यालयाकडे १ जानेवारीपासून वर्ग केला आहे.शासनाच्या या धोरणानुसार कोणताही पाटबंधारे तलाव, नदी, नाले, ओढ्यासाठी पाणी उपसा परवाना, ना-हरकत प्रमाणत्र, बिगरशेती प्रमाणपत्र अशी कामे आता कऱ्हाड ओगलेवाडी येथील टेंभू योजनेच्या कार्यालयामार्फत केली जाणार आहेत. याची अधिकृत कार्यवाही १ एप्रिलपासून सरू होणार आहे. या गोष्टीला दुष्काळी तालुक्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे.याबाबत टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे म्हणाले की, शासनाने टेभू योजनेचे पाणी ज्या ज्या गावांना मिळते, त्या सर्व गावांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने टेभू सिंचन प्रकल्प ओगलेवाडी कार्यालयाकडे हे काम वर्ग केले आहे. परंतु शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना तालुक्यातूनच पाणी परवाना आणि अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.