शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कमळापुरात पत्नी, मेहुण्यावर कुऱ्हाडीने हल्ला

By admin | Updated: December 13, 2015 01:09 IST

दोघेही गंभीर : दुहेरी खुनाचा प्रयत्न; हल्लेखोर विटा पोलिसांत हजर

विटा : खानापूर तालुक्यातील कमळापूर येथे विलास खाशाबा साळुंखे (वय ६२) याने पत्नी व बहिणीच्या पतीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी चिंगूताई विलास साळुंखे (५५, रा. कमळापूर) व बहिणीचा पती नानासाहेब ऊर्फ भाऊसाहेब तुकाराम देवकर (६०, मूळ गाव वेजेगाव, ता. खानापूर) गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कमळापूर ते आळसंद रस्त्यावरील वडाचा मळा येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर स्वत: विटा पोलिसांत हजर झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, मेहुणे नानासाहेब देवकर आमच्या कुटुंबात भांडणे लावत असल्यामुळेच कुऱ्हाडीने घाव घातल्याचे हल्लेखोर विलासने पोलिसांना सांगितले असले, तरी घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. कमळापूर येथील वडाचा मळा नावाच्या वस्तीवर विलास साळुंखे याचे कुटुंब वास्तव्यास आहे. त्याच्या बहिणीचे निधन झाल्याने वेजेगाव येथील बहिणीचा पती नानासाहेब कमळापूर येथे अधूनमधून राहण्यास येतात. गेल्या महिन्याभरापासून ते विलासच्या घरी राहण्यास होते. शनिवारी सायंकाळी नानासाहेब घरात असताना विलासने अचानक त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने दोन घाव घातले. या हल्ल्यात नानासाहेब यांच्या मेंदूला इजा पोहोचल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यावेळी आवाज झाल्याने अंगणात असलेली विलासची पत्नी चिंगूताई घरात जात असतानाच विलासने पाठीमागून येऊन त्यांच्याही पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात त्याही गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर विलास दुचाकी घेऊन थेट विटा पोलिसांत हजर झाला. चिंगूताई यांच्या सून रूपाली जनावरांच्या गोठ्यात साफसफाई करीत असताना ही घटना त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी शेजारचे लोक जमा झाले. जखमींना प्रथम विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना मिरजच्या वॉन्लेस रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. नानासाहेब देवकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. घरात भांडणे लावत असल्याच्या संशयावरून वाद देवकर यांना दोन मुले असून, एक मुलगा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सोने-चांदी गलाई व्यवसायात आहे, तर दुसरा मुलगा वेजेगाव येथे शेती करतो. पत्नीचे निधन झाल्यानंतर देवकर अधूनमधून कमळापुरात राहण्यास येत होते. ते कमळापुरात येऊन घरात भांडणे लावत असल्याचा संशय विलासला होता. त्यामुळे तो त्यांना कमळापुरात येण्यास विरोध करत होता. त्यातूनच त्यांच्यात वाद झाल्याने नानासाहेब यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. पत्नी चिंगूताई हिलाही रागाच्या भरात पाठीत कुऱ्हाडीने वार करून जखमी केल्याचे विलासने पोलिसांना सांगितले.