शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘सागरेश्वर’मधून काळवीट नामशेष

By admin | Updated: March 16, 2016 23:41 IST

अभयारण्यात प्राणीगणना : हरणांची संख्या घटली

अतुल जाधव-- देवराष्ट्रेयशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये नुकतीच प्राणीगणना पार पडली. यामध्ये काळवीट जातीची हरणे अभयारण्यातून पूर्णपणे बाहेर पडल्याचे दिसत आहे, तर मागील वर्षाच्या तुलनेत चितळ जातीच्या हरणांची संख्याही घटल्याचे दिसत आहे. चाऱ्याअभावी बाहेर पडणाऱ्या हरणांचे वाढते प्रमाण आणि मोकाट कुत्र्यांकडून होत असलेली शिकार ही मुख्य कारणे यामागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.सुरुवातीच्या काळात अभयारण्यात चितळ, सांबर आणि काळवीट जातीच्या हरणांच्या बारा जोड्या सोडण्यात आल्या होत्या. अभयारण्यातील एका विशिष्ट जागी (मृगविहार) तारेचे कुंपण घालून त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा विरोध असतानाही ही हरणे मुक्त करण्यात आली. हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यात पोषक चारा आणि पाण्याची कमतरता जाणवू लागली. त्यानंतर बहुतांशी हरणे अभयारण्याच्या बाहेर पडली. चारा आणि पाण्याच्या शोधार्थ असलेल्या प्राण्यांना मोकाट कुत्र्यांमुळे प्राणाला मुकावे लागले आहे.नुकतीच वन विभागाने प्राण्यांची गणना केली असून, यामध्ये २००८ च्या तुलनेत प्राण्यांचे प्रमाण घटल्याचेच वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या वनमंत्री पदाच्या कार्यकालात अभयारण्याचा खऱ्याअर्थाने विकास केला. कोट्यवधींची विकासकामे केली, मात्र प्रशासनाने बाहेरील हरणे अभयारण्यामध्ये घेण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. २००८ मध्ये अभयारण्यात २२९ सांबर, ३२८ चितळ आणि २५० काळवीटांची संख्या होती. २०१६ मध्ये झालेल्या गणनेमध्ये मात्र अभयारण्यामध्ये काळवीट जातीची हरणे अजिबात पाहावयास मिळत नाहीत. तसेच चितळ ११६ व सांबर ४३८ आढळून आली. यातून चितळांची संख्याही घटल्याचे दिसत आहे.अभयारण्याबाहेर हरणे : प्रशासनाचे दुर्लक्षप्रत्यक्षात अभयारण्याबाहेर हरणांची संख्या लक्षणीय आहे. माळरानावर कळपाने हरणे फिरताना दिसत आहेत. मोकाट हरणांकडून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. खरे तर अभयारण्याला चेनलिंक जाळीचे कुंपण घालताना बाहेरील हरणांना अभयारण्यात घेणे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यावेळी ही बाब प्रशासनाच्या का लक्षात आली नाही? हा प्रश्नच आहे. यामुळे निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.