शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

टेंभू योजनेच्या पाण्याचा गार्डीच्या दिशेने प्रवास

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

पाणी टंचाईचे संकट दूर : करंज ओढ्यातील ३० बंधारे भरणार, ऐन उन्हाळ््यात मिळणार दिलासा

माहुली : टेंभू योजनेचे पाणी रविवारी पाटबंधारे विभागाने मुख्य कालव्याव्दारे करंज ओढ्यात सोडले असून, या पाण्याचा गार्डी (ता. खानापूर) गावाच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. पाटबंधारे विभागाने रविवारी कि. मी. ११ ते २२ कि. मी. पर्यंत मुख्य कालव्यातून पाणी आणून करंज ओढ्यात सोडण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्यामुळे गार्डी, घानवड व हिंगणगादे या तीन गावातील करंज ओढ्यातील सुमारे ३० बंधारे टेंभूच्या पाण्याने भरणार असून, ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहे.पाटबंधारे विभागाने टेंभूचे पाणी साळशिंगे, गार्डीच्या करंज ओढ्याकडे प्रवाहित केले आहे. आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी गावच्या करंज ओढ्यात पहिल्यांदाच टेंभूचे पाणी पोहोचणार आहे. टेंभू योजनेचे आवर्तन पंधरा दिवसांपासून सुरू आहे. आटपाडी, सांगोल्याकडे जाणारा कालवा प्रवाहित करण्यात आला आहे. रविवारपासून भाग्यनगर, साळशिंगे, सांगोले, गार्डीकडे पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. भाग्यनगरचा तलाव, सांगोले, वेजेगाव, गार्डी ओढ्यावरील बंधारे पाण्याने भरले जाणार आहेत. करंज ओढ्याचे दोन वर्षापूर्वी जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, भाग्यनगरच्या तलावातही टेंभूचे पाणी सोडण्यात आले आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावानजीक असणाऱ्या अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना चांगल्यापध्दतीने कार्यान्वित होणार आहेत. नागेवाडी, भेंडवडे, साळशिंगे, भाग्यनगरच्या शेतकऱ्यांना पाणी उपयोगी ठरणार आहे. मुख्य कालव्यात एका पंपाव्दारे सुमारे १०० ते १२५ क्युसेक पाणी प्रवाहित करण्यात आले आहे. टेंभूचे पाणी पहिल्यांदा मुख्य कालव्यातून १० व्या कि. मी. पर्यंत आणण्यात आले होते. आता टेंभूच्या पाण्याचा ११ ते २२ कि. मी. पर्यंतच्या प्रवासाचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)गार्डी, घानवड व हिंगणगादे या तीन गावच्या हद्दीत असणाऱ्या करंज ओढ्यात ठिकठिकाणी ३० हून अधिक बंधारे आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात या ओढ्यात मोठा जलसाठा होणार असून, उन्हाळी हंगामातील पिकांसह गार्डी, घानवड, हिंगणगादे येथील पाणी टंचाई दूर होणार आहे. या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठीही होणार असून, पशुधनाचा प्रश्न संपुष्टात येणार आहे.