शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू दूध संघाची वाटचाल आदर्शवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना राज्यस्तरावरील महत्त्वाच्या संस्थांवर काम करण्याची संधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. विनायकराव ...

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना राज्यस्तरावरील महत्त्वाच्या संस्थांवर काम करण्याची संधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. विनायकराव पाटील यांनी तोट्यात असणारी महानंद ही संस्था प्रगतीपथावर आणत नफ्यात आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू दूध संघ नामांकित संस्था म्हणून वाटचाल करेल, असा विश्वास जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी व्यक्त केला.

येथील राजारामबापू दूध संघाच्या कार्यस्थळावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दुग्धदिन आाणि महिला मेळावा झाला. सिनेअभिनेत्री अक्षया देवधर व राजवीरसिंह राजे (लाडू) यांची प्रमुख उपस्थिती होती. राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी तांबवे येथील शहाजीराव दादा पाटील जय भवानी दूध संस्थेस २५ हजार रुपये रोख व राजारामबापू चषक देऊन गौरविण्यात आले.

अक्षया देवधर म्हणाल्या, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू दूध संघ आणि कृष्णा दूध राज्यभरात लौकिक प्राप्त आहे. विनायकराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दूध उत्पादकासाठी अर्थसहाय्यावर दुधाळ जनावरे खरेदी योजना सुरू करीत असल्याचे जाहीर केले.

प्रा. शामराव पाटील म्हणाले, राजारामबापू उद्योग समूहातील सर्व संस्था जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील, तालुकाध्यक्षा सुश्मिता जाधव, सभापती शुभांगी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी विजयराव पाटील, जे. के. पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, अल्लाउद्दीन चौगुले, सुरेश गावडे, दादासाहेब पाटील, नेताजीराव पाटील, विलासराव पाटील, उदयसिंग पाटील, संग्राम फडतरे, पोपटराव जगताप, बबनराव सावंत, अनिल खरात, रमेश पाटील, विकास कांबळे, बजरंग खोत, उज्ज्वला पाटील, बी. बी. भंडारी, पी. डी. साळुंखे उपस्थित होते. उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

फोटो ओळी- १६०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर महिला मेळावा न्यूज

इस्लामपूर येथे राजारामबापू दूध संघाच्या मेळाव्यात दिलीपराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनायकराव पाटील, अक्षया देवधर, राजवीरसिंह राजे, प्रा. शामराव पाटील, नेताजीराव पाटील, विलासराव पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.