शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एकीसाठी पुढे आल्या जिजाऊंच्या लेकी

By admin | Updated: September 23, 2016 23:37 IST

क्रांती मोर्चाच्या नियोजनात पुरुषांच्या बरोबरीने सहभाग : दोन हजारावर स्वयंसेवक तरुणींची नोंदणी

सांगली : कोपर्डीच्या घटनेनंतर सर्वच स्तरांमधून, विशेषत: स्त्रियांमधून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त होत असून, कोपर्डीचा निषेध, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर जिजाऊंच्या या लेकी मराठा क्रांती मोर्चात ताकद दाखविणार आहेत. मराठा समाजात एकी टिकावी यासाठी सांगलीतील मोर्चाच्या नियोजनातही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. घरा-घरातील चुलीपर्यंत पोहोचत, मोर्चात सहभागी होणे किती महत्त्वाचे हे ठसवण्यात महिला यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी अक्षरश: पायाला भिंगरी लावून प्रचार यंत्रणा राबविली आहे. राज्यभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चांतून कोपर्डी घटनेबद्दलचा तीव्र असंतोष दिसून येत आहे. या मोर्चांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. मंगळवारी सांगलीत होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीचा जागर पदोपदी जाणवत आहे. मोर्चाच्या नियोजनाच्या पहिल्या बैठकीपासूनच महिलांनी सक्रिय सहभाग दाखविला आहे. मोर्चामध्ये अग्रभागी विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी, महिला असा क्रम असल्याने, मोर्चात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी जोरदार नियोजन केले जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र महिलांच्या बैठका सुरू आहेत. त्यांच्या सहभागासाठी दोन हजाराहून अधिक तरुणींनी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून ते राम मंदिर चौकापर्यंत सर्व ठिकाणी ठराविक अंतरावर तरुणींची पथके तैनात असणार आहेत. यात प्रत्येक दहा तरुणींमागे एक प्रमुख असणार आहे. मोर्चाच्या सुरुवातीपासून ते गर्दी कमी होईपर्यंत या तरुणी दिलेल्या ‘स्पॉट’वर थांबतील. या सर्वांना एकच ‘ड्रेस कोड’ आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असणाऱ्या शिस्तबध्दतेला प्राधान्य देण्यासाठी पथक कार्यरत असणार आहे. याबाबत तरुणींना अधिक माहिती देण्यासाठी शनिवार व रविवारी बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)