लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यामागे राजमाता जिजाऊंची प्रेरणा होती. त्यांचे हे उपकार महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी केले.
भाजपच्या वतीने आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयात जिजामातांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. गाडगीळ यांच्या हस्ते जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गाडगीळ म्हणाले की, शिवछत्रपतींना स्वराज्याचा मंत्र जिजाऊंनी दिला. त्यामुळे इतर सरदार आदिलशाही, निजामशाहीत चाकरी करीत असताना शिवछत्रपतींनी मात्र स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरविले. ही राजमाता जिजाऊ यांचीच प्रेरणा होय. त्यांचे हे उपकार महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून गाडगीळ यांनी अभिवादन केले.
यावेळी प्रकाश बिरजे, नगरसेवक विनायक सिंहासने, सुब्राव मद्रासी, नगरसेविका सविता मदने, गीतांजली ढोपे-पाटील, धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, अशरफ वांकर, विश्वजित पाटील, अतुल माने, धनेश कातगडे, गौस पठाण, इम्रान शेख, रवींद्र बाबर, श्रीकांत शिंदे, गणपती साळुंखे, आदी उपस्थित होते.