शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी चोरणाऱ्या टोळीस सांगलीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 00:08 IST

सहा जेसीबी जप्त : पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर, धुळे जिल्ह्यांत विक्री

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव व कवठेमहांकाळ येथून जेसीबी चोरणाऱ्या टोळीचा गुंडांविरोधी पथकाने शुक्रवारी पर्दाफाश केला. टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरलेल्या जेसीबींची त्यांनी पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर व धुळे जिल्ह्यांत विक्री केली होती. पथकाने या पाचही शहरात छापे टाकून सहा जेसीबी जप्त केले आहेत. त्यांची किंमत एक कोटी नऊ लाख रुपये आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली.अटक केलेल्यांमध्ये मोहन वसंत बाबर (वय ४१, रा. लोकरेवाडी, ता. कवठेमहांकाळ), पतंगराव केशव दुपटे (४३, रा. पूर्वा आर्केड, फ्लॅट क्रमांक १०, गोकुळनगर, धानोली, पुणे), बापूराव शंकर वाघमोडे (२९, देऊळगावसिद्धी, जि. अहमदनगर, सध्या फिनोलेक्स कॉलनी, पिंपरी पुणे) यांचा समावेश आहे. संशयितांनी कवठेमहांकाळ व तासगाव येथील जेसीबी मालकांना गाठून, जेसीबी भाड्याने पाहिजे, असे सांगितले. त्यानुसार मालकांनी भाडेकरार करून त्यांच्या ताब्यात सहा जेसीबी दिले होते. करार संपल्यानंतर संशयितांनी जेसीबी परत आणून दिलेच नाहीत. उलट ते अचानक गायब झाले. त्यामुळे जेसीबी मालकांनी कवठेमहांकाळ व तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तीन महिन्यांपूर्वी या घटना घडल्या होत्या. स्थानिक पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सुगावा लागला नव्हता. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुंडाविरोधी पथकास या जेसीबींच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडून याचा गेल्या पंधरवड्यापासून तपास सुरू होता. संशयित मोहन बाबर हा पुण्यात राहायला असल्याचे समजताच प्रथम त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये हे जेसीबी त्याने पुणे, सातारा, अहमदनगर, लातूर व धुळे जिल्ह्यात विक्री केल्याची कबुली दिली. त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. तिघांना सोबत घेऊन पथकाने या पाच जिल्ह्यांत छापे टाकले. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे एक जेसीबी विकला होता. ज्यांनी जेसीबी विकत घेतले होते, त्यांच्याकडून ते जप्त केले आहेत. त्यांना या गुन्ह्यात साक्षीदार करण्यात आले असल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, शंकर पाटील, योगेश खराडे, प्रफुल्ल सुर्वे, सागर लवटे, परशुराम महाजन, पोलिस मुख्यालयाकडील विकास कांबळे, सोहेल काथीयानी, दिग्विजय साळुंखे, संतोष माळी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. त्यांना तपासात अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)दोन पथके तैनात : जेसीबी चोरीचा तपास बाहेरील जिल्ह्यात गेल्याने तपासासाठी निरीक्षक घनवट यांनी दोन पथके तयार केली होती. अहमदनगर, लातूर, धुळे, पाटण (जि. सातारा) येथून प्रत्येकी एक व पुण्यातून दोन असे एकूण सहा जेसीबी जप्त केले आहेत. नांदेड, अमरावती, अकोला, नंदुरबार, करमाळा (जि. सोलापूर) येथेही संशयितांंनी जेसीबी विक्री केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे, असे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. याचा तपास अजूनही सुरू आहे. आणखी कोठून जेसीबी चोरीला गेले आहेत का, याचा उलगडा करण्याचे आदेश दिले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.आवळे यांचे कौतुक : जेसीबी चोरणाऱ्या टोळीची माहिती सर्वांत प्रथम गुंडाविरोधी पथकातील हवालदार महेश आवळे यांना मिळाली होती. त्यांच्या माहितीमुळे या टोळीचा पर्दाफाश झाला. तसेच चोरीच्या प्रलंबित सहा गुन्ह्यांचा छडाही लागला. त्यामुळे पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी आवळे यांचे कौतुक केले.