शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: October 9, 2015 00:47 IST

‘एफआरपी’चा वाद पेटला : शेतकरी संघटनेच्या नेत्यांतच मतभिन्नता

अशोक पाटील -इस्लामपूर -एफआरपीचे तुकडे केल्यास उसाचे दांडके दाखवू, कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही, एफआरपी एकरकमी देण्यासाठी येणारा हंगाम बंद ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी साखरसम्राटांना दिला आहे. या तिघा नेत्यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच कृती होत नसल्याने, शेतकरी संघटनांचा शो ‘फ्लॉप’ ठरत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. त्याचे श्रेय राजू शेट्टी यांना मिळाले आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात येत असलेल्या व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी एफआरपी रक्कम न देण्याचाच विडा उचलला आहे. याविरोधात खासदार शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन याविरोधात आवाज उठविला असला तरी, जयंत पाटील यांनी याची कसलीही दखल घेतल्याचे दिसत नाही. नुकत्याच झालेल्या सभेत पाटील यांनी कारखाना कसा तोट्यात आहे, आम्ही एफआरपी का देऊ शकत नाही, याचा पाढाच गिरवला. त्यामुळे सभासदांनीही त्यांच्या भूमिकेला विरोध केला नाही. शेवटी एफआरपी रकमेचा मुद्दा बाजूलाच राहिला. या सभेत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील व्यासपीठावर बसले होते. त्यांनी तर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एफआरपी रक्कम एकरकमी मिळेपर्यंत पुढील हंगाम सुरु करणार नसल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी शक्कल लढवत एफआरपीमधून प्रकल्प निधी ठेवीच्या नावाखाली कपात केली आहे. परिणामी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा शो ‘फ्लॉप’ ठरत चालला आहे.‘विश्वास’ची वाटचाल खासगीकरणाकडेनुकत्याच झालेल्या विश्वास साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखाने खासगी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. तसा ठरावही त्यांनी केला आहे. या ठरावाला त्यांच्या घरातूनच मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. यापूर्वीही पाटील यांचे स्रेही असलेल्या कडेगाव तालुक्यातील पृथ्वीराज देशमुख यांचा डोंगराई, शिराळा तालुक्यातील शिवाजीराव देशमुख यांचा निनाई कारखाना खासगी झाला आहे. आता विश्वास कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यामागे जयंत पाटील सूत्रधार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.