शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या पुत्रांची राजकीय मशागत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:10 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे दोन्ही पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांनी दोघा मुलांना तालुक्यात संपर्कासाठी आणले आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी व ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे दोन्ही पुत्र प्रतीक आणि राजवर्धन पाटील यांनी राजकीय मशागतीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार जयंत पाटील यांनी दोघा मुलांना तालुक्यात संपर्कासाठी आणले आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी व राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकाºयांची रेलचेल दिसते.इस्लामपूर मतदार संघात घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजारामबापू पाटील यांच्यापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलापर्यंत घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राजारामबापू यांच्या पश्चात अचानक जयंत पाटील यांना राजकारणात यावे लागले. हीच परंपरा पुढे आली असून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यांनीही गेल्या वर्षभरात इस्लामपूर मतदार संघात राजारामबापू उद्योग समूहात लक्ष केंद्रित केले आहे. या दोघांच्याही प्रसिध्दीसाठी राष्ट्रवादी व उद्योग समूहातील पदाधिकाºयांत चांगलीच रेलचेल सुरू आहे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचाही राजकीय वारसा त्यांचे पुत्र अ‍ॅड. चिमण व विश्वास डांगे यांनी जोपासला आहे. चिमण डांगे यांनी नगरसेवक, नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे बंधूही पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही राष्ट्रवादीची धुरा सक्षमपणे पेलली आहे. त्यांचेही पुत्र वैभव शिंदे आणि विशाल शिंदे हे राजकीय पटलावर कार्यरत आहेत. वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.इस्लामपूर मतदार संघात वाळव्याच्या हुतात्मा संकुलाचे राजकारण चांगलेच चर्चेत असते. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र वैभव नायकवडी, स्नुषा सुषमा नायकवडी, नातू गौरव नायकवडी आपापल्यापरीने राजकारणात स्थिरावले आहेत. परंतु त्यांनी अद्याप कोणत्याही पक्षाला जवळ केलेले नाही. तेथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांचेही पुत्र संग्राम पाटील यांची नुकतीच वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे.अशीच परिस्थिती पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांची आहे. त्यांचे दोन्ही पुत्र राजकारणात सक्रिय आहेत. दोघांनीही सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. राहुल इस्लामपूर, तर सम्राट शिराळा मतदार संघातून चाचपणी करत आहेत. शेतकरी चळवळीतील उदयास आलेल्या सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाले आणि त्यांचा मुलगा सागर खोत यांच्या राजकीय घरणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला होता.एकूणच वाळवा तालुक्यात मातब्बर नेत्यांच्या वारसदारांचीच चलती आहे. आता प्रतीक व राजवर्धन तालुक्यात सक्रिय झाल्यामुळे जयंत पाटील यांना आणखी बळ मिळणार आहे.कार्यकर्त्यांचे प्रेम...प्रतीक व राजवर्धन यांच्याकडे अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस अथवा राजारामबापू समूहातील कोणतीही जबाबदारी नसली तरी, तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना यापूर्वीच स्वीकारले आहे. मतदार संघात विविध ठिकाणच्या दौºयावेळी जयंत पाटील यांना मानणारे कार्यकर्ते दोघांवरही प्रेम व्यक्त करताना दिसतात.