शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंतदादा’ला मदतीचे आदेश जयंतरावांचे

By admin | Updated: April 23, 2017 23:52 IST

दिलीपतात्या पाटील : कारखान्याबाबत सूडबुद्धीचे राजकारण नसल्याचे स्पष्टीकरण

सांगली : वसंतदादा साखर कारखाना ताब्यात घेऊन आम्ही सूडबुद्धीचे राजकारण करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक वसंतदादा कारखाना चालू राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश मला आ. जयंत पाटील यांनीच दिले होते, अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात दिली. कामगार नेते आर. बी. शिंदे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त वसंत कामगार भवनात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी दिलीपतात्या बोलत होते. दिलीपतात्या म्हणाले की, वसंतदादा कारखाना ताब्यात घेऊन मोठी जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. काही चुकले तर लोक बँकेकडे व माझ्याकडेच बोट दाखविणार आहेत. या सर्व गोष्टीची कल्पना असली तरी, चांगल्या भावनेने ही जबाबदारी घेतली आहे. मी राजारामबापू पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता असताना, वसंतदादा कारखाना कामगारांच्या कार्यक्रमाला मला बोलाविण्यात आले आहे. यामागचे गणित मला कळाले आहे. कामगार आणि शेतकऱ्यांची देणी, कारखाना चालला तरच मिळणार आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर दिला असल्याने देणी मिळणार, याची खात्री सर्वांनी बाळगावी. थकीत देण्यांबाबत जिल्हा बँक कामगार व शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे. चर्चेतून देण्यांबाबत मार्ग काढण्यात येईल. कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी सर्वच संचालक मंडळाने स्वीकारली आहे. यामध्ये खासदार संजयकाका पाटील यांचाही समावेश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, कामगारांच्या व्यथा काय असतात, याची मला जाणीव आहे. बँक म्हणून कोणाचेही नुकसान होऊ न देण्याची आमची जबाबदारी आहे. चांगल्या लोकांच्या हाती कारखाना देण्यात येणार असल्याने देणी निश्चितपणे मिळतील. हा कारखाना पुन्हा नावारुपास आणण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते कामाला लागलो आहोत. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, आर. बी. शिंदे यांनी वसंतदादा कारखान्याप्रती निष्ठा राखताना कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या काळातच कामगार एक होते. आता थोडा विस्कळीत झाल्यासारखा वाटत आहे. त्यांची देणी मिळणार असल्याने कामगारांनी एकत्रच राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी, कामगार, शेतकरी, सभासदांची देणी कायदेशीर असल्याने कोणीही बुडवू शकत नसल्याचे स्पष्ट केले. स्वागत व प्रास्ताविक कामगार नेते प्रदीप शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, बजरंग पाटील, तात्यासाहेब काळे, श्रीपती पाटील, शंकरराव भोसले आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)विशाल पाटील यांचे राजकारणकारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात देऊन विशाल पाटील मोकळे झाले आहेत. ते मोकळे झाले की आमच्या मागे लागणार आहेत. कारखान्यावर येणारी जबाबदारी बँकेवर ढकलून त्यांनी राजकीय खेळी खेळली आहे. ते आमचे पाहुणे असले तरी, राजकारणात दोघांचे विचार वेगळे आहेत, असे दिलीपतात्या पाटील यांनी स्पष्ट केले. तुम्ही काँग्रेसमध्येच आहात का? वसंतदादा कारखान्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचे सांगत असताना संजयकाकांनी मध्येच विशाल पाटील यांना सवाल केला, ‘तुम्ही अजून काँग्रेसमध्येच आहात का?’ यावर उपस्थितांत हशा पिकला. शिंदे यांना आदरांजलीयावेळी उपस्थित राजकीय नेते, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार यांनी आर. बी. शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कारखाना केव्हाही विकू शकतो...वसंतदादा कारखाना कायदेशीररित्या जिल्हा बँकेकडे तारण आहे. हा कारखाना जिल्हा बँक केव्हाही विकू शकते. तरीही आम्ही तसा निर्णय घेतला नाही. सूडबुद्धीनेच वागायचे असते, तर कारखाना विकून मोकळे झालो असतो. आम्हाला खऱ्याअर्थाने कारखाना वाचवायचा आहे, असेही दिलीपतात्या यांनी स्पष्ट केले.