शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात जयंतराव-सदाभाऊंची खलबते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:57 IST

राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.

विटा : राज्यात शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे विरोधक माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर यांनी इस्लामपूर येथे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यात १५ मिनिटे खलबते झाली.विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सदाशिवराव पाटील यांना राष्टÑवादीने पाठिंबा दिला होता. परंतु, शिवसेना आणि भाजप युतीमुळे राजेंद्रअण्णा देशमुख, गोपीचंद पडळकर यांनी आ. बाबर यांना ताकद दिली. परिणामी, बाबर यांचा २६ हजार मतांनी विजय झाला. निकालानंतर सेना-भाजपमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाल्याने शिवसेनेने राष्टÑवादी व कॉँग्रेसचा पाठिंबा घेऊन महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेतून बाबर यांच्या मंत्रिपदाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात राष्टÑवादीचीही भूमिका महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची सदाशिवराव पाटील, वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक, सुशांत देवकर, किरण तारळेकर, विश्वनाथ कांबळे, किसन जानकर या नेत्यांनी इस्लामपूर येथे जाऊन भेट घेतली. दिल्लीला जाण्यासाठी आ. पाटील यांची घाई सुरू असतानाही पंधरा मिनिटे खलबते झाली.या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ही भेट राजकीय नसून, आ. पाटील यांना केवळ शुभेच्छा देण्यासाठी झाल्याचे राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.