शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव-पवारांचा सामना

By admin | Updated: June 2, 2017 23:29 IST

जयंतराव-पवारांचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व माजी आमदार संभाजी पवार गट आमने-सामने येणार आहेत. दोन्ही गटाकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कारंदवाडी येथील सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून एकेकाळचे कट्टर समर्थक आता विरोधक बनले आहेत. सध्या हा कारखाना राजारामबापू साखर कारखान्याच्या ताब्यात आहे. याबाबत न्यायालयीन दावेही सुरू आहेत. त्यातच सर्वोदय कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना गती आली आहे. कारखान्याच्या मतदार यादीवरूनही दोन्ही गटात वाद झाला होता. पण त्याचा निकाल लागताच निवडणुकीचे वेध लागले होते. आष्टा, नरवाड, हरिपूर, बावची, तुंग या गटात कारखान्याचे सभासद विखुरलेले आहेत. पूर्वी कारखाना कार्यक्षेत्रातील आणि मिरज पश्चिम भागातील गावे संभाजी पवार यांच्या मतदार संघात होती. आता ती जयंतरावांच्या मतदार संघात आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या वाळवा तालुक्यात जयंत पाटील विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकत्र आहेत. त्याचा फायदा उचलण्याचा पवार गटाचा प्रयत्न राहील. पवार गटाची धुरा अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यावर आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वीच गटनिहाय बैठका व सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यातून लवकरच उमेदवारांची यादीही तयार केली जाणार आहे. कारखान्याची मालकी सभासदांच्या हाती राहावी, या मुद्द्यावर पवार यांनी जोर दिला आहे. दुसरीकडे कार्यक्षेत्रात जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. आष्टा, बावची, तुंग, समडोळी या परिसरात जयंतरावांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्या जोरावर या निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांच्या समर्थकांनी चालविली आहे. पण अद्यापपर्यंत जयंत पाटील यांच्याकडून कोणताच आदेश आलेला नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ६ जून आहे. त्यात रविवार वगळता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहतो. त्यामुळे सोमवार व मंगळवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. विलासराव शिंदे गटाची भूमिका महत्त्वाचीआष्टा परिसरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार विलासराव शिंदे यांचे वर्चस्व आहे. सध्या शिंदे गट जयंतरावांवर नाराज आहे. त्यांचे चिरंजीव वैभव यांनी नुकताच भाजपप्रवेश केला आहे. त्यामुळे उट्टे काढण्याची खेळी शिंदे गटाकडून होऊ शकते. शिवाय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, काँग्रेसचे नेते नानासाहेब महाडिक, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भूमिकाही या परिसरात निर्णायक आहे. त्यामुळे या जयंतराव विरोधकांकडून संभाजी पवार गटाला बळ मिळणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. सात अर्जांची विक्रीसर्वोदय साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू झाली. दिवसभरात दोन्ही गटाकडून सात अर्ज नेण्यात आले आहेत. सर्वसाधारण गटासाठी एक हजार, तर इतर गटासाठी तीनशे रुपये अनामत आहे.