शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांचा धूर्तपणा आणि राजकीय खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ...

त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ‘कृष्णा’तील सर्व गटांमध्ये त्यांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. याही निवडणुकीत त्यांनी मौन पाळले आहे.

नेर्ले-तांबवे गट विधानसभेच्या शिराळा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र, या गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. या गटात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीतच वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ‘कृष्णे’च्या रणांगणात पक्षीय राजकारणाला फाटा देऊन उतरतात. अशीच परिस्थिती बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात आहे. या गटात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील हे सहकार पॅनलमधून विद्यमान संचालक आहेत. बोरगाव जिल्हा परिषद गटातही त्यांचेच वर्चस्व आहे. तेथे जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटील आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतात, परंतु, ‘कृष्णे’ची निवडणूक मात्र दुर्लक्षित करतात.

जयंत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सोबत घेऊन त्यांची वाटचाल सुरु आहे, परंतु कदम यांनी ‘कृष्णे’च्या निवडणुकीत रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांची पाठराखण केली आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर मतदार संघातील बहुतांशी कार्यकर्त्यांना राजारामबापू उद्योग समूहात संधी मिळत नाही, असे कार्यकर्ते स्वबळावर कोणत्याही गटातून निवडून गेले तरी जयंत पाटील हरकत घेत नाहीत. कारण तो कार्यकर्ता आपल्यापासून दुरावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा धूर्तपणा त्यामागे आहे.

- अशोक पाटील, इस्लामपूर