शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढणार

By admin | Updated: October 9, 2015 00:47 IST

राजू शेट्टी : नेर्ले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा; ‘एफआरपी’ची रक्कम एकाच वेळी द्या

नेर्ले : मी शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलो आहे. शेतकऱ्यांसाठी शेवटपर्यंत लढणार आहे. आम्ही भाडोत्री मंडळी नव्हे. जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मला निवडून दिले आहे. येणाऱ्या काळात जयंत पाटील यांच्या भानगडी बाहेर काढू. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांचे कारस्थान उधळून लावू, असा इशारा खा. राजू शेट्टी यांनी दिला.नेर्ले (ता. वाळवा) येथे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आनंदराव पाटील अध्यक्षस्थानी होते.खा. राजू शेट्टी म्हणाले, जयंत पाटील, तुम्ही मंत्री होता तेव्हा बगलबच्चांना घेऊन दरोडे घातले. परंतु मी शेतकऱ्यांसाठी लढलो. दरोडे घातले नाहीत. हा तुमच्या नि माझ्यातला फरक आहे. एफआरपीपेक्षा कमी दर देणाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन तुम्ही करणार काय? की त्यासाठी तुमच्या हातात काडीपेटी आम्ही देऊ?. १६ तारखेच्या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.यावेळी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, एकरकमी एफआरपीची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करा, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. कायद्याने दिलेले संरक्षण व हक्क अबाधित ठेवण्यासाठी एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे राहतील. ते खासगी करण्याचे मनसुबे धुळीला मिळवू.महेश पाटील यांनी स्वागत केले. हणमंतराव कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहाजी पाटील, उत्तमराव पाटील, डॉ. एस. व्ही. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास देशमुख, जयकर कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.सभेस पी. वाय. पाटील, एल. एम. पाटील, जयकर पाटील, जयसिंग माने, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)