शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्याला अच्छे दिन येणार का?

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

मूलभूत प्रश्न सुटण्याची गरज : तालुका विभाजनाकडेही गांभीर्याने लक्ष हवे

भागवत काटकर - जत -केंद्रात व राज्यात भाजपचे शासन, तर जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांच्या रूपाने भाजपची सत्ता आली आहे. तालुक्यातील रस्ते, ६७ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश, तालुका विभाजन आदी कामे प्रलंबित राहिली आहेत. आता भाजपचे विलासराव जगताप यांना संधी मिळाल्याने, जत तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांना पहिल्यांदाच जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. मोदी लाटेच्या गणिताने संजयकाका खासदार झाले. त्यांच्या विजयानंतर जगताप यांनी तालुक्यात गावोगावी आभार दौरे करून पुन्हा नेटवर्क उभे केले. पाटील यांच्याकडून लोकांच्याही तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्याचा फायदा या निवडणुकीत जगताप यांना झाला. आता दुष्काळी जत तालुक्यातील जनतेच्या असंख्य अपेक्षा विद्यमान आमदार जगताप यांच्याकडून व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेतील वंचित ६७ गावांचा समावेश, तालुक्यातील ७0 टक्के रस्त्यांची दुरुस्ती, संख पोलीस ठाणे मंजुरी आदी कामांचा समावेश आहे.जत पूर्व भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांना भरघोस मताधिक्य दिले. या पूर्व भागातील लोकांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत, एक तालुका विभाजन व दुसरी म्हैसाळ योजनेत समावेश. वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जनतेला पाण्याच्या टँकरपासून मुक्ती हवी आहे. या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्यास ऊस तोडीसाठी जाणाऱ्या सुमारे २५ ते ३५ हजार मजुरांचे स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जत तालुक्याचे क्षेत्रफळ अधिक आहे. १२३ गावांच्या या तालुक्याचे विभाजन करण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. शासकीय कामासाठी या भागातील लोकांना ५0 ते ६0 कि.मी. अंतरावर जतला यावे लागते. जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, रेशन कार्डधारकांची विविध कामे या व इतर कामासाठी जत येथील तहसील कार्यालयाकडे यावे लागते.ही कामे एका दिवसात कधीच होत नाहीत. यासाठी वेळ, पैसा विनाकारण खर्च करण्याची वेळ जनतेवर येते. यासाठी तालुका विभाजन होणे ही एक प्रमुख मागणी आहे. शिवाय संख येथे पोलीस ठाण्याची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.केंद्रात, राज्यात एकाच विचाराचे शासन आहे. नूतन आमदार विलासराव जगताप हे अभ्यासू व संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्त्व आहे. तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तालुक्याला अच्छे दिन येणार का? अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रस्ते दुरुस्तीची गरजजत तालुक्यात ६0 ते ७0 टक्के रस्ते कच्चे आहेत. खराब रस्त्यामुळे लोकांचा वेळ व वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. जत शहरातील रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी होत आहे. महसूल विभागाचा कारभार तर अत्यंत कमी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. १0 ते १२ गावांसाठी एक तलाठी अशी अवस्था आहे.