शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

महापालिका पटावर जामदारांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:39 IST

काँग्रेसच्या गटबाजीत अस्तित्वाची लढाई : कुरघोडीला लगाम घालण्याचे आव्हान

शीतल पाटील -- सांगली महापालिकेच्या राजकीय पटावरील वजीर म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांची सध्या मोठी कोंडी झाली आहे. पालिकेतील गटबाजीने डोके वर काढले असून, एकाचवेळी तीन गटांना सांभाळून काम करण्याची करसत त्यांना करावी लागत आहे. त्यात ते नेमके कुणाच्या गटाचे? याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिली पाच वर्षे शहराच्या राजकारणावर सांगलीकरांचे वर्चस्व राहिले. पालिकेचे नेतृत्व माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्याची हिंमत कोणातच नव्हती. मदनभाऊ समर्थक नगरसेवकांना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. किशोर जामदार हे मदनभाऊंचे सहकारी. मिरजेत त्यांचा चांगला वट होता. मिरजेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. २००५ नंतर पालिकेच्या राजकारणात जामदारांचा खऱ्याअर्थाने उदय झाला. केवळ सहा महिन्यांसाठी मिळालेल्या महापौरपदावर त्यांनी तब्बल तीन वर्षे अधिराज्य केले. विरोधक मग, तो पक्षातील असो अथवा विरोधी पक्षातील, त्याला नामोहरण करण्याची कला त्यांच्याकडे होती. जामदारांनी महापौरपदाच्या काळातच पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित करीत एकतर्फी सत्तेचा लाभ घेतला. त्यातून बीओटी, ऐनवेळी घुसडलेले ठराव, आरक्षित जागा उठविण्याचा घाट यावरून त्यांच्या कारभारावर प्रचंड टीका झाली. विरोधी पक्षातील काही महत्त्वाकांक्षी नगरसेवकांना सोबत घेतल्याने त्यांना पदावरून हटविणेही पक्षनेतृत्वाला अडचणीचे झाले होते. परिणामी पहिल्यांदाच २००८ मध्ये महापालिका निवडणुकीत मदनभाऊ गटाला पराभवाचा धक्का बसला.२०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. पालिकेतील काँग्रेसमध्ये सर्वात ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या किशोर जामदार यांच्याकडे गटनेते पदाची सूत्रे आली. पहिल्या दोन महिन्यातच स्वीकृत नगरसेवकांवरून काँग्रेसमध्ये वाद उफाळला. जामदारांनीच नावे घुसडल्याचा आरोप झाला. त्यांना पदावरून दूर करण्याची मागणीही झाली. शेवटी हे वादळ शांत झाले. कांचन कांबळे यांच्या महापौरपदाच्या काळात जामदारांचेच सभागृहात वर्चस्व होते. विवेक कांबळे यांच्या काळात मात्र त्याला शह बसला. त्यातून सत्ताधाऱ्यांत दुफळी निर्माण झाली. याच काळात मदनभाऊंचे निधन झाल्याने सत्ताधारी गटाला सर्वात मोठा धक्का बसला. सध्या पालिकेत मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम व विशाल पाटील असे तीन गट कार्यरत आहेत. या तीनही गटात एकमेकांवर कुरघोड्याचे राजकारण रंगले आहे. एकमेकांचा काटा काढण्याचा डाव आखला जात आहे. महासभा, स्थायी समितीतील ठरावावरून उणीदुणी काढण्याचे काम जोमाने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांतील संघर्षाने परमोच्च बिंंदू गाठला आहे. विविध पदांवर सर्वच गटांकडून हक्क सांगितला जात आहे. या संघर्षात गटनेतेपदाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. स्थायी समिती सदस्य निवडीपासून ते पक्षाचा व्हिप काढण्यापर्यंतचे अधिकार जामदारांकडे आहेत. कोणत्या नेत्याचे आदेश मानायचे, कोणत्या गटाला प्राधान्य द्यायचे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पालिकेच्या राजकारणात जामदार चाणाक्ष आहेत. आतापर्यंत त्यांनी नेत्यांपासून नगरसेवकांपर्यंत साऱ्यांनाच झुलवले आहे. त्यांचा अंदाज अजूनही कुणाला आलेला नाही. चाणक्य नितीने राजकारण करणाऱ्या किशोर जामदारांना आता मात्र असित्वाची लढाई खेळावी लागेल. कधीकाळी त्यांच्या गटाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट करून त्यांना आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर जामदारांचा वट काहीसा कमी झाल्याचे दिसते. आजही ते सर्व गटाशी जवळीक साधून आहेत. त्यांची खरी कसोटी पुढील अडीच वर्षात लागणार आहे. प्रभाग सभापती, स्थायी समिती सदस्य व सभापती निवड, दहा महिन्यानंतर होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडीत जामदारांची खऱ्या अर्थाने कसोटी लागेल. तेव्हा ते कोणत्या गटाचे हेही सिद्ध होईल. किशोरदादा : सांगा कुणाचे?किशोर जामदार हे नेमके कुणाचे? याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. जामदार हे मदनभाऊ समर्थक मानले जातात. त्यांची पतंगराव कदम यांच्याशीही जवळीक आहे. कदम गटाचे नगरसेवकही जामदार आमचेच आहेत, असे म्हणतात. आता त्यात विशाल पाटील गटाची भर पडली आहे. वसंतदादा कारखान्याचे ते संचालक असल्याने विशाल पाटील गटही दादा आमचे नेते आहेत, असे जाहीरपणे सांगत आहेत.