शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसाठी सांगलीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 15:46 IST

सांगली, दि. ६  : मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्यावतीने गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकरच क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला.मानधन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे ...

सांगली, दि. ६  : मानधन वाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांच्यावतीने गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर जेल भरो आंदोलन करण्यात आले. गांधीगिरीने सुरू असलेले हे आंदोलन लवकरच क्रांतिसिंहांच्या चळवळीसारखे जहाल होईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला.

मानधन आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, अशा घोषणा देत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी सभेचे नेते बिराज साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे, जिल्हाध्यक्ष ललिता चौगुले, रेखा पाटील आदी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाºयांना मानधन नको, वेतन हवे, कृती समितीच्या ज्येष्ठतेनुसार व आराखड्यानुसार मागण्या शासनाने मान्य कराव्यात, भाऊबीज मानधनाएवढी असावी, आजारपणाची रजा असताना मानधन मिळावे, एक महिन्याची उन्हाळी सुटी मिळावी, मानधन दरमहा वेळेत मिळावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या काही महिलांना अटक केली.

प्रा. शरद पाटील म्हणाले, शासनाच्या आडमुठेपणामुळे अंगणवाडी सेविकांवर संपाची वेळ आली आहे. या संपामुळे लहान मुले, कुपोषित बालके, गर्भवती महिलांच्या पोषण आहाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

या खात्याचा कारभार एका अपरिपक्व महिलेकडे आहे. त्यांनी या महिलांच्या समस्यांकडे सहानुभूतीने पाहणे गरजेचे आहे. मात्र राज्य शासनाकडून तसे होताना दिसत नाही. या आंदोलनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे जबाबदार आहेत. या गोष्टीचा आम्ही जनता दलाच्यावतीने तीव्र निषेध करीत आहोत.

आंदोलनाला जनतेतून पाठिंबा : बिराज साळुंखे

यावेळी बिराज साळुंखे म्हणाले, अंगणवाडी कर्मचाºयांच्या या आंदोलनाला जनतेतून पाठिंबा आहे. शिस्तबध्द पध्दतीने आंदोलन सुरू आहे. तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही. त्यामुळे यापुढे आणखी तीव्र आंदोलन करावे लागेल.

अन्यथा क्रांतिसिंहांचा मार्ग अवलंबणार : के. डी. शिंदे

शासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात. आतापर्यंत गांधींनी शिकविलेल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. पण शासन जर का असेच वागत राहिले, तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री ठोकण्याच्या आंदोलनाला सुरुवात करावी लागेल, असा इशारा अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी दिला.