शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी

By अशोक डोंबाळे | Updated: February 17, 2023 20:30 IST

'लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रच लढणार.' 

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढत होती, तेव्हा लोक ताकदीने आमच्यासोबत उभे होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो ती आमची चूक होती, ती पुन्हा होणार नाही. आम्ही आता स्वतंत्रच लढू, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत मांडली.

शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबतचे संबंध एक वर्षापूर्वीच तोडले आहेत. त्यावर पुनर्विचार करावा, अशी गरज आम्हाला वाटत नाही. संबंध तोडणे चुकीचे होते, असेही आम्हाला वाटत नाही. कारण, प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे.

शेतकरी हिताला बाधा येईल, अशीच धोरणे राबविली आहेत. त्याविरुद्धची लढाई स्वतंत्रपणे सुरू राहील. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत. आघाड्यांच्या भानगडीत पडणे ही आमची चूक होती. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या आघाड्यांमध्ये आम्ही थेट सहभागी होणार नाही. या आघाड्यांच्या भानगडींमुळे आमचे नुकसान झाले आहे.ठाकरेंनी हात पुढे केला तरी आम्ही स्वतंत्रच राहूशिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील छोटे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी हात पुढे केला तर विचार करणार का, या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, आता कोणत्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा ती चूक करणार नाही. कोणत्याच आघाड्यांत सहभागी होणार नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी