शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’ने दाखविला ई-मीटर तपासणीला ठेंगा!

By admin | Updated: August 29, 2016 00:15 IST

रिक्षाचालकांची कोंडी : साडेचारशे रिक्षांचे पासिंग थांबले

सचिन लाड, सांगली : ई-मीटर’ तपासणीचा ‘ट्रॅक’ पुन्हा आयटीआय विभागाकडे सोपविण्यात आला असला तरी, त्यांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. ‘आम्ही तपासणी करणार नाही’, असे त्यांनी आरटीओ कार्यालयास कळविले आहे. गेल्या वर्षभरापासून वजन-मापे विभागाकडून तपासणी केली जात होती. पण त्यांना तपासणीचा ट्रॅक यशस्वीपणे राबविता आला नाही. याविरुद्ध येथील रिक्षाचालकांनी आंदोलने केल्यानंतर गेल्या महिन्यात तपासणीचा ट्रॅक आयटीआयडे सोपविण्यात आला होता. रिक्षा तंदुरुस्त आहे की नाही, यासाठी वर्षातून एकदा आरटीओ कार्यालयातून तपासणी (पासिंग) करून घ्यावे लागते. यामध्ये रिक्षातील मीटर सुरू आहे का नाही, याची तपासणी करून त्याचा दाखला आरटीओंना द्यावा लागतो. मीटर तपासणीचे काम पूर्वी आयटीआय कार्यालयाकडे होते. तिथे केवळ ८० रुपये घेतले जात. ६ जून २०१५ पासून मीटर तपासणीचे काम वजन- मापे विभागाकडे सोपविण्यात आले. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी वजन-मापे विभागाचे अधिकारी शंभरफुटी रस्त्यावर येत असत. तत्पूर्वी रिक्षाचालक मीटर तपासणी करून घेण्यासाठी रांग लावून उभे असायचे. वजन-मापे खात्याचे अधिकारी आठवड्यातून एकदाच मीटर तपासणीला वेळ देत असल्याने, रिक्षाचालकांची गैरसोय झाली होती. शिराळा, आटपाडी, जत या शंभर किलोमीटरच्या गावांवरून रिक्षाचालक येत असत; पण अनेकदा अधिकारीच येत नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा गावाकडे परत जायला लागायचे. दंडाचा भुर्दंड रिक्षाचालकांना वजन-मापे विभागाकडून ई-मीटर तपासणीचे काम वेळेत न झाल्याने शेकडो रिक्षांचे पासिंग थांबले होते. पासिंग वेळेत होत नसल्याने आरटीओंकडून प्रतिदिन २० रुपये दंड आकारला जात होता. शासकीय यंत्रणेच्या या कारभाराचा त्रास रिक्षाचालकांना सहन करावा लागत होता. ई-मीटर तपासणी पूर्वीप्रमाणे आयटीआय विभागाकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी करुन रिक्षाचालकांनी अनेकदा आंदोलन केले होते. याची आरटीओ दशरथ वाघुले यांनी दखल घेतली. तसेच पासिंग का थांबते, याचीही त्यांनी चौकशी केली. त्यानंतर त्यांनी ई-मीटर तपासणीचे काम आयटीआय विभागाकडे सोपविले. पण आयटीआयनेही त्यास नकार दिला आहे. त्यामुळे ८ आॅगस्टपासून साडेचारशेहून अधिक रिक्षांचे पासिंग थांबले आहे. याचा आर्थिक भुर्दंड रिक्षाचालकांना सोसावा लागत आहे.