शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्या चैतन्यदायी आठवणींचा ग्रंथ व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:22 IST

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या ...

येथील मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त पाटणे यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्या सुलक्षणा कुलकर्णी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख नितीन माने, आदी उपस्थित होते. पाटणे म्हणाले की, पतंगराव कदम यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शिक्षण, शेती आणि सहकार क्षेत्रात विकासपर्व उभे केले. त्यांनी समाजहिताचा विचार कृतीत आणताना निर्धार आणि निर्भयता दाखवली. कामाची सचोटी आणि माणसे सांभाळण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

चौकट :

सांगलीने दिली पंचपीठे

सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या इतिहासाला पंचपीठे दिली आहेत. यात यशवंतराव चव्हाण हे विचारपीठ, वि. स. पागे हे संत शक्तिपीठ, वसंतदादा पाटील हे लोकपीठ, आर. आर. पाटील हे शांतिपीठ, तर डॉ. पतंगराव कदम हे ज्ञानाचे चैतन्यपीठ होते, असे पाटणे म्हणाले.

फोटो ओळ :

कडेगाव येथील मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानात प्राचार्य यशवंत पाटणे यांनी विचार मांडले.