पुनवत :
कोरोनाचे लवकर निदान व वेळेत उपचार केले तर कोरोनाचा प्रसार रोखून साखळी तोडणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन कोरोना जनजागृती समिती सदस्य व व्याख्याते हिम्मतराव नायकवडी यांनी केले.
मंगरूळ (ता. शिराळा) येथील श्री चिंचेश्वर वाचनालयात आयोजित जनजागृती व्याख्यानात ते बोलत होते. वाचनालय पदाधिकाऱ्यांनी आरोग्य, पोलीस, महसूल, साफसफाई
कामगार, अंगणवाडी शिक्षिका, आशा स्वयंसेविका यांच्या कोरोना कार्यकाळातील सेवेचे कौतुक करत त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी नायकवडी म्हणाले, कोरोना रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांशी आपलेपणाने वागून त्यांना मानसिक आधार द्या.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. टी.डी. मस्के, सचिव वसंत खवरे, संचालक सुरेश शेणवी, दिनकर सापते आदी उपस्थित होते.