शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जतमध्ये विघ्नहर्त्याच्या विसर्जनाचेच मोठे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:08 IST

गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांपुढे गणपतीचे विसर्जन कोठे करायचे, ...

गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांपुढे गणपतीचे विसर्जन कोठे करायचे, हा प्रश्न गावा-गावातून निर्माण झाला आहे.तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी आहे. वाड्या-वस्तीवर गणेश मंडळे आहेत. अनेक मंडळांनी मोठ्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. यावर्षी मंडळांची नोंदणी आॅनलाईन करण्यात आली आहे. आॅनलाईन सेवेला इंटरनेट सुविधा व्यवस्थित मिळत नसल्यामुळे नोंदणीकृत मंडळांची संख्या कमी आहे. जत पोलीस ठाण्याकडे ३२ व उमदी पोलीस ठाण्याकडे ६८ मंडळांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात गणेश मंडळांची संख्या जास्त आहे. अनेक मंडळे नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत.नारळी पौर्णिमेनंतर तालुक्यात परतीच्या पावसाचा प्र्रवास सुरू होईल, असे वाटत होते. पण अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. विहिरी, ओढे, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. नळ पाणी पुरवठा योजनांच्या विंधन विहिरी, परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने पाण्याची पातळी ४०० ते ५०० फुटापर्यंत खाली गेली आहे. तालुक्यातील ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ऐन पावसाळ्यातही अंकलगी, दरीबडची, कोंत्येवबोबलाद, व्हसपेठ, सोन्याळ, बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, हळ्ळी, कोणबगी, काराजनगी, सोनलगी, सोरडी, अंतराळ, आसंगी (जत), तिल्याळ, पांढरेवाडी, लमाणतांडा (दरीबडची), शिंगणापूर, सनमडी, वज्रवाड, बसरगी, टोणेवाडी, मिरवाड, बेळुंखी, बाज, कुडणूर, जिरग्याळ, लकडेवाडी या गावांनी टॅँकरची मागणी केली आहे. यामधील बागलवाडी, माडग्याळ, माणिकनाळ, तिकोंडी, शिंगणापूर व कोणबगी या सहा गावात प्रशासनाने टॅँकर सुरू न करता पर्यायी पाण्याचे स्रोत उपलब्ध करून दिले आहेत.आडात नाही : पोहऱ्यात कोठूनपावसाअभावी तलाव, कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गणेश मंडळांची संख्या अधिक आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आकाराने मोठ्या आहेत. त्यांचे विसर्जन करण्यासाठी जास्त खोलीच्या पाण्याची गरज आहे. जास्त पाणी नसल्याने मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मूर्ती व निर्माल्यामुळे पाणी दूषित होत असल्याने, विहिरीत गणेश विसर्जन करायला शेतकरी सहमती देत नाहीत.पाऊसही रुसला...तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ४५७.७ मि.मी. असून, आजअखेर १६४.१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोरडी, सिद्धनाथ, तिकोंडी - १, तिकोंडी - २, पांडोझरी, बेळुंखी, खोजानवाडी अशा सात तलावातील पाणीसाठा संपला आहे. संख माध्यम प्रकल्प, दोेड्डनाला मध्यम प्रकल्प व दरीबडची, गुगवाड, मिरवाड, डफळापूर, बिळूर, केसराळ, उमराणी, भिवर्गी, शेगाव क्र. २ या तलावातील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे.