शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वयाच्या वरील नागरिकांनाच लस दिली जात होती. परंतु आता पुन्हा ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसातच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. परंतु लस घेत असताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे अत्यंत आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जात असल्याचे प्रकार अनेक केंद्रांच्या ठिकाणी समोर येत आहेत.

चौकट

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तिला निरीक्षणाखाली ठेवावे लागते.

कोट

लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार केंद्रावर काहीवेळ थांबावे लागते. नागरिकांच्या भल्यासाठीच ती सूचना आहे. अद्याप जिल्ह्यात कोणालाही रिॲक्शन आल्याचा प्रकार घडलेला नाही. तरीही काळजी घेतली जात आहे. लस घेणाऱ्यांनीही सुचनांचे पालन करावे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली

चौकट

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण ७,६०,४२०

पहिला डोस ६,२८,३६६

दुसरा डोस १,३२,०५४

एकूण केंद्र ३,४६२

प्राथमिक आरोग्य केंद्रे २,१३७

चौकट

लस हेच औषध

सध्या लसीकरण हाच एकमेव चांगला पर्याय लोकांसमोर आहे. लसीकरणामुळे मोठे सुरक्षाकवच मिळणार असल्याने नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकरण लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करावा. आता लसही उपलब्ध होत आहे.