शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती विकासाची कोल्हेकुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 23:57 IST

विजय कुंभार : सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचा नुसता फार्स

इस्लामपूर : इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादीने २०१६-१७ चा सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे विकास कामाची कोल्हेकुई आहे. सभागृहात सादर केलेला १०७ कोटींचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. झालेला विकास आणि आगामी काळात होणारी विकासकामे याचा सत्ताधाऱ्यांनी नुसता फार्स केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.विजय कुंभार म्हणाले की, १९८५ पासून सत्ताधाऱ्यांनी फक्त कुसूमगंध बगीचा, राजारामबापू नाट्यगृह, बंद पडलेला पोहण्याचा तलाव, उद्ध्वस्त केलेले अंबिका उद्यान, तेथून गायब झालेली मिनी रेल्वे, तोट्यातील क्लब हाऊस, कोट तलावातील बोटिंग क्लब, निकृष्ट दर्जाची घरकुल योजना, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला गांडूळ खत प्रकल्प ही विकासकामे केली आहेत. यातील बहुतांशी प्रकल्प बंद आहेत. यावर कोट्यवधी रुपये केलेला खर्च पाण्यात गेला आहे.सत्ताधारी सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर चर्चा न करता वाय-फायवर हाय-फाय चर्चा करतात. कोणतीही करवाढ केली नाही, असा डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दुसरीकडे मात्र नवीन मालमत्ताधारकांवर प्रचंड करवाढ लादली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना कागदावरच राहिली असल्याचे अर्थसंकल्पात दिसते. शहराची एकूण पाणीपट्टी २ कोटी ८ लाख रुपये भरली जाते. एकूण पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३६ लाख असून, पालिकेस ७२ लाख नफा होतो. मुंबईसारख्या मेट्रो शहरातही घरगुती एक हजार लिटर पाण्यासाठी ४.५० पैसे दर आहे. (वार्ताहर)नागरिकांमध्ये नाराजीपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर अर्थसंकल्प फुगवला आहे. त्यामध्ये भुयारी गटारी ३० कोटी, घरकुल ११ कोटी अशा ४१ कोटी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. तसेच इस्लामपूर शहरातील रस्ते प्रकल्पासाठी शासनाने २४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत. ते २ वर्षे बँकेत ठेवल्याने त्याचे ५ कोटींचे व्याज पालिकेने घेतले आहे. परंतु शहरातील रस्ते आणि भुयारी गटार योजना हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.