शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा विकास आराखडा कायद्याच्या कचाट्यात...

By admin | Updated: June 24, 2016 01:16 IST

राजकारण रंगणार : शासनाच्या विरोधात जाऊन पालिकेची मंजुरी; आराखड्यास राज्य शासन स्थगिती देईल : सदाभाऊ खोत

अशोक पाटील--इस्लामपूर  पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शासनाविरोधात जाऊन विकास आराखडा मंजूर केला आहे. राष्ट्रवादीने हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. मात्र त्यांच्या निर्णयाची वाट न पाहताच नगरविकास खात्याला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. या आराखड्याला शासन निश्चितच स्थगिती देईल, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.१९८० च्या आराखड्यानंतर नियोजित विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आतापर्यंत तक्रारी, हरकतींमुळे पालिकेने शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीसुध्दा हा आराखडा अन्यायी असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. खासदार राजू शेट्टी यांनी हा आराखडा रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दोन-तीन बैठका घेतल्या आहेत. सर्व विरोधी पक्षांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या आराखड्यासंदर्भात चौकशी केल्यानंतरच मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु याला बराच कालावधी लोटल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर हा आराखडा मंजूर करून थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.१९८0 मधील काही आरक्षणे सत्ताधाऱ्यांनी आजही विकासित केलेली नाहीत. आरक्षणाची भीती दाखवून काही भूखंड नाममात्र किंमतीत खरेदी करुन त्यावर सध्या बांधकामे उभी केली आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादीतील काही मालमत्ताधारकांनी स्वत:ची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा विकास आराखडा मंजूर होणे सत्ताधाऱ्यांच्या गरजेचे होते. याउलट सर्वसामान्यांच्या घरावर पुन्हा आरक्षणे टाकून हा आराखडा अन्यायी केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, तो बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वत:च्या मालमत्ता २0३0 पर्यंत सुरक्षित करण्यासाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना हाताशी धरुन ए. डी. डी. पी. कलम ३१ चा चुकीचा अर्थ काढून २३ मालमत्ताधारकांच्या घरावर नांगर फिरवला आहे. त्यांच्या तक्रारी असतानाही सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने आराखडा मंजूर करुन घेतला आहे. शासनाच्या विरोधात जाऊन बहुमतावर केलेल्या आराखड्याविरोधात शासनाकडे दाद मागणार आहोत.-विजय कुंभार, विरोधी पक्ष नेते, इस्लामपूरमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षइस्लामपूर येथील विकास आराखडा रद्द करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. यावर दोन ते तीन बैठकाही झाल्या. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले. त्यामुळेच राष्ट्रवादीने बहुमताने आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये भाजपची मोठी चूक आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी केला आहे.१९८0 च्या विकास आराखड्यात ५६ आरक्षणे होती. त्यातील ५ ते ७ आरक्षणे रद्द झाली. जी आरक्षणे राहिली, परंतु आमदार जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे ज्यांना सत्ता दिली, त्याच सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची आरक्षणे सभागृहात ठराव करुन उठवली आणि त्याची विक्री केली आहे. विकास आराखड्याचा ठराव सभागृहाने केला आहे. यावर मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनी ती फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे आराखड्याविरोधात लढा उभारावा.- वैभव पवार, माजी नगरसेवक, इस्लामपूर.