इस्लामपूर येथील इस्लामपूर अर्बन बॅँकेच्या वार्षिक सभेत संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भगवानराव पाटील, अशोक उरुणकर, आनंदराव मलगुंडे, शहाजी पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : दि इस्लामपूर अर्बन को-ऑप. बँकेने सभासद हिताला प्राधान्य दिले आहे. विजयभाऊ पाटील यांच्या शिस्तीतून वाढलेल्या या बँकेने ५१ कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण केला असून लवकरच बँक १०० कोटी रुपयांचा टप्पा करेल. बँकेस करपूर्व नफा ३३ लाख इतका झाला आहे. बँक सभासदांना ५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संदीप विजयराव पाटील यांनी दिली.
अर्बन बँकेची ८६ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. विजयभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी दि. १० सप्टेंबर रोजी बँकेच्या स्वमालकीच्या नेर्ले शाखेचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. पाटील म्हणाले, बँकेने नेहमीच सभासद हितासह सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्या बांधीलकीतून बहे येथील पूरग्रस्त सभासदांना विजयभाऊ यांच्या स्मृतिदिनी दि. ५ सप्टेंबर रोजी संसारोपयोगी साहित्य किट वाटप करण्यात येणार आहे. बँकेने ऑडिट वर्ग ‘अ’ राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष पै. भगवानराव पाटील, संचालक व नगरसेवक शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय पाटील उपस्थित होते. संचालक शंकर चव्हाण यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष अशोक उरुणकर यांनी आभार मानले.
चौकट
बँकेस विजयभाऊ यांचे नाव
या सर्वसाधारण सभेदरम्यान बँकेस विजयभाऊ यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विजयभाऊ अर्बन को-ऑप बँक लि.,इस्लामपूर असे नामकरण होणार आहे. या ठरावाचे सर्वच सभासदांनी स्वागत केले.