शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा आराखडा नगरपालिकेमध्ये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:46 IST

सर्वसाधारण सभा : राज्य शासनावर ठपका

इस्लामपूर : गेल्या तीन वर्षांपासून शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सभागृहाने शासनाच्या मंजुरीची वाट न बघता बहुमताने मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनाच्या बेकायदेशीर कामाचे वाभाडे काढताना, विकासासाठी आलेला कोट्यवधींचा निधी कुठे मुरला, याची आठ दिवसात माहिती द्या, अशी मागणी करीत वातावरण तापवले.पालिका नाट्यगृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली.बी. ए. पाटील प्रारूप विकास आराखड्यावर म्हणाले की, नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार पालिकेने कार्यवाही केलेली आहे. नियोजन समितीच्या प्रस्तावावर शासनाने किमान सहा महिन्यांत विकास योजनेचा मसुदा मंजूर करणे, प्राधिकरणाला फेरफार करण्याचे निर्देश देणे किंवा मंजुरी देण्यास नकार देऊन नवीन विकास योजना तयार करण्यासाठी निर्देश देण्याची तरतूद आहे. मात्र यावर शासनाकडून वेळेत कोणतीही वैधानिक कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सभागृहाने केलेला ठराव योग्य व कायदेशीर आहे. विरोधी पक्ष नेते विजय कुंभार म्हणाले की, सभागृहाने शासनाविरोधात जाऊन ठराव करण्याची घाई करू नये. त्यासाठी थोडी वाट बघावी. त्यावर खंडेराव जाधव म्हणाले की, शासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शहराचा विकास खुंटला आहे. आता वाट बघण्यात अर्थ नाही. कुंभार यांनी गेल्या ३० वर्षात एकही आराखडा करता आला नाही, असा टोला मारला.चिमण डांगे म्हणाले की, गेली १४ महिने शासन निर्णयाची वाट पाहिली, आता मंजुरी द्या. विरोधी गटाचे कपिल ओसवाल म्हणाले की, शहर विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आरक्षणानंतर हरकती घेतलेल्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.शेवटी कुंभार व ओसवाल यांनी विरोध दर्शवल्यानंतर हा प्रारूप विकास आराखडा बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेतील चर्चेत विजयभाऊ पाटील, आनंदराव मलगुंडे, अरुणादेवी पाटील यांनी भाग घेतला. (वार्ताहर)संजय कोरेंचा सत्ताधाऱ्यांवरही निशाणाउपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनासह सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला. तांत्रिक मंजुरी मिळण्याआधी निविदा निघते, कामे होतात. उपनगरातील नागरिकांना उपेक्षित ठेवले जाते. शेताकडे जाणाऱ्या वस्त्यांवरील रस्त्यांचे डांबरीकरण होते. डांबरीकरण, काँक्रिटीकरण फोडून पेव्हींग ब्लॉक बसवले जातात. त्यामुळे विकासासाठी आलेला पैसा कोठे गेला, याची पूर्ण माहिती आहे. आठ दिवसात या पैशांचा हिशेब द्या, अशी मागणी त्यांनी केली.