इस्लामपूर : येथील कर्ण प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी लहान व खुल्या गटातील कर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित साळुंखे यांनी दिली. शहर युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष स्वरूप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात सकाळी ५.३० वाजता व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
साळुंखे म्हणाले, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा अंतराची स्पर्धा होईल. महिलांसाठी ५ किलोमीटर अंतर असेल. १० ते ४५ वयोगट आणि ४५ वयापासून पुढे अशा दोन गटांतील स्पर्धा होतील. विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. बिपीन राजमाने, सुशांत मोरे, उमाकांत कापसे, विवेक शेटे, रोहित पाटील, अमित साळुंखे, रविराज ताटे, सुशांत पाटील संयोजन करीत आहेत.