शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरची कन्या करणार ‘आर्मी परेड डे’चे संचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST

इस्लामपूर : सध्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील लष्करी तळावर कार्यरत असणाऱ्या कॅप्टन रुचिका प्रकाश पाटील १५ जानेवारीरोजी दिल्लीत होणाऱ्या ...

इस्लामपूर : सध्या उत्तर प्रदेशातील मथुरा येथील लष्करी तळावर कार्यरत असणाऱ्या कॅप्टन रुचिका प्रकाश पाटील १५ जानेवारीरोजी दिल्लीत होणाऱ्या ७२ व्या लष्करी दिनाचे संचालन करणार आहेत.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेच्या देदिप्यमान परंपरेचे देशवासीयांना दर्शन घडविले जाते. त्यासाठी इस्लामपूूरची सुकन्या असणाऱ्या कॅप्टन रुचिका पाटील यांची निवड प्रेरणादायी ठरली आहे.

१५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के. एम. करिअप्पा यांनी देशाच्या लष्कराचे पहिले प्रमुख म्हणून सूत्रे हातात घेतली. ब्रिटिश अधिकारी कमांडर फ्रान्सिस बुचर देशाचे शेवटचे लष्करी अधिकारी ठरले. तेव्हापासून गेली ७२ वर्षे १५ जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो. याविषयी दिल्लीच्या कॅन्टोनमेंट परिसरातील करिअप्पा परेड मैदानावर लष्करातील सर्व विभागाचे संचलन केले जाते. या परेडमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना मानवंदना दिली जाते. या आर्मी परेड डेमध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र हे सर्वोच्च पुरस्कार वगळता शौर्यपदक, सेनापदक, वीरचक्र व इतर पुरस्कारांनी देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय कामगिरी केलेल्या सैनिकांचा व अधिकाऱ्यांचा लष्करप्रमुखांच्याहस्ते गौरव केला जातो. परमवीर चक्र, महावीर चक्र, अशोक चक्र हे सर्वोच्च पुरस्कार २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्याहस्ते वितरित केले जातात.

चाैकट

उत्कृष्ट कामगिरी

कॅप्टन रुचिका या निवृत्त कर्नल प्रकाश शंकरराव पाटील यांच्या कन्या, तर डॉ. विश्वास पाटील-खेडकर यांच्या पुतणी आहेत. कॅप्टन रुचिका यांनी लष्करी सेवेतील सर्वांत खडतर प्रशिक्षण देणाऱ्या चेन्नईच्या यंग ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमधील गुणवत्तेच्या जोरावर सप्टेंबर २०१४ मध्ये लष्करी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षांत त्यांनी कॅप्टन पदावर मोहोर उमटवली. त्यांनी आतापर्यंत राजस्थान, जम्मू-काश्मीरच्या संवेदनशील सीमावर्ती भागात काम करत पुणे आणि सध्या मथुरा येथे लष्करी सेवेत त्या कार्यरत आहेत.

फोटो -३११२२०२०-आयएसएलएम-रुचिका पाटील