शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर व्यायाम मंडळ जिल्ह्याची क्रीडा पंढरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST

इस्लामपूर : इस्लामपूर व्यायाम मंडळ ही संस्था सांगली जिल्ह्याची क्रीडापंढरी म्हणून ओळखली जाते. व्हॉलिबॉल आणि कबड्डीची दिग्विजयी परंपरा नव्या ...

इस्लामपूर : इस्लामपूर व्यायाम मंडळ ही संस्था सांगली जिल्ह्याची क्रीडापंढरी म्हणून ओळखली जाते. व्हॉलिबॉल आणि कबड्डीची दिग्विजयी परंपरा नव्या खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. एकाच छताखाली ३०० हून अधिक मुले इथे क्रीडांगणावर येतात, हे उद्याच्या पिढीचे भवितव्य उज्वल आहे, याची साक्ष देणारे मंडळाचे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार युवा नेते प्रतीक पाटील यांनी काढले.

येथील हुतात्मा स्मारकातील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या मैदानावर शासनाचा उत्कृष्ट जिल्हा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळालेले राष्ट्रीय कबड्डीपटू सतीश मोरे यांचा सत्कार प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. मंडळाचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक पोपट पाटील, मानसिंग पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रतीक पाटील यांनी पहिल्यांदाच या मैदानावर हजेरी लावली.

पोपट पाटील यांनी मंडळाच्या यशोदायी कारकीर्दीची प्रतीक पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कबड्डी आणि व्हॉलिबॉल खेळाडूंशी संवाद साधला. दोन्ही खेळांचे प्रदर्शनीय सामने पाहिले. व्यायाम मंडळातील खेळाडूंची शिस्त, वक्तशिरपणा आणि कष्टाची तयारी या बाबी पाहून प्रतीक पाटील यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे मुख्यालय असणाऱ्या कार्यालयात जाऊन गेल्या ३५ वर्षांच्या क्रीडा कारकीर्दीची सचित्र माहिती घेतली.

यावेळी मामा इटकरकर, विश्वास साळुंखे, राजेंद्र सातपुते, विश्वास भावे, राजू देसाई, मुख्याध्यापक संजय ढोबळे-पाटील, आनंदराव वडार, जालिंदर जाधव, व्हॉलिबॉल प्रशिक्षक प्रकाश पाटील, सूरज पाटील, नितीन मदने, क्रीडाधिकारी जमीर अत्तार, राहुल पवार, प्रा. संदीप पाटील, श्रीकांत पाटील, आर. एच. जाधव, महादेव पाटील, उद्योजक रणजित पाटील, स. पो. नि. अभिजित पाटील, जयकर पाटील, अ‍ॅड. सुयोग पाटील, संजय जाधव, कुमार वडार, सचिन पाटील, प्रशांत घोरपडे, महेश वडार, गौरव इंगळे, वैभव उरुणकर, अमोल खोत, विकास पवार, किरण परीट उपस्थित होते.

फोटो -१६०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर क्रीडा न्यूज

इस्लामपूर येथे राष्ट्रीय कबड्डीपटू सतीश मोरे यांचा सत्कार प्रतीक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोपट पाटील, आनंदराव वडार, विश्वास साळुंखे, नितीन मदने, प्रशांत घोरपडे उपस्थित होते.