शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर, बोरगाव-रेठरेहरणाक्ष परिसरात ‘रयत’चे ‘सहकार’ला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या रणसंग्रामात रयत आणि संस्थापक पॅनलच्या मनोमिलनाचे गुऱ्हाळ अखेर थांबले. त्यानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : ‘कृष्णे’च्या रणसंग्रामात रयत आणि संस्थापक पॅनलच्या मनोमिलनाचे गुऱ्हाळ अखेर थांबले. त्यानंतर सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी ‘रयत’ची पाठराखण करत सहकार पॅनलला आव्हान दिले आहे. त्यामुळे इस्लामपूर परिसरासह बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील ‘रयत’च्या उमेदवारांना ऊर्जा मिळाली आहे. आता अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र निश्चित होईल. त्यानंतर प्रचाराला गती येणार आहे.

बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील रेठरेहरणाक्ष गावाला नेहमी प्राधान्य मिळते. या गावात ८७३ मतदान आहे. पंधरा वर्षे ग्रामपंचायतीच्या कारभारात कार्यरत असलेले जे. डी. मोरे यांना ‘सहकार’ने उमेदवारी दिली आहे. याच गावातील दिलीप मोरे, अ‍ॅड. विवेकानंद मोरे यांना रयत पॅनलने उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे. यातील दिलीप मोरे यांचे नाव निश्चित होण्याचे संकेत आहेत. संस्थापक पॅनलकडून या गावात केदार शिंदे यांचे नाव निश्चित होते. परंतु, पवार-मोरे यांच्यातील लढतीमुळे महेश पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. त्यातून संस्थापक पॅनलशी निष्ठावान असलेल्या शिंदे भावकीत नाराजीची चर्चा आहे. बोरगावातही अशीच परिस्थिती आहे. विद्यमान संचालक जितेंद्र पाटील यांना ‘सहकार’ची उमेदवारी निश्चित आहे. तेथे उदय शिंदे आणि मानाजी पाटील संस्थापक पॅनलकडून इच्छुक आहेत. माजी संचालक उदय शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे, तर रयत पॅनलकडून विश्वास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. येथे एकूण सभासद संख्या ८८८ आहे. जितेंद्र पाटील यांच्यापुढे संस्थापक पॅनलचे उदय शिंदे आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे.

इस्लामपुरात उमेदवारीबाबत संस्थापक पॅनलकडून घोडे अडले आहे. दिवंगत एम. डी. पवार यांच्या घरातील शिवाजी पवार यांचे नाव निश्चित झाले असल्याने त्यांचा प्रचार सुरू आहे. परंतु, गत निवडणुकीत उभे राहिलेले युवराज पाटील यांना पाऊल मागे घेण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तेही नाराज असल्याची चर्चा आहे. रयत पॅनलकडून मात्र इस्लामपुरातून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि कामेरीतून प्रा. अनिल पाटील यांना उमेदवारी दिल्याने या पॅनलची जमेची बाजू भक्कम होत चालल्याची चर्चा आहे. इस्लामपुरात ७५३, तर कामेरीमध्ये ७३६ सभासद आहेत.

बहे येथे सहकार पॅनलचे जयश्री पाटील, अविनाश खरात उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात रयत पॅनलकडून सुरेखा पाटील (शिरटे) व बहे येथून सावित्री पाटील उमेदवार आहेत. संस्थापक पॅनलकडून मीनाक्षी दमाने यांचे नाव चर्चेत आहे. या गटातील रयत आणि संस्थापक पॅनलकडून उमेदवारी निश्चित झालेली नाही. बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात सहकार पॅनल काॅंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रयत पॅनलसमोर आव्हान उभे करेल, अशी चर्चा आहे.

कोट

बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटातील आमचे उमेदवार निश्चित आहेत. त्यांनी सभासदांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांतील ‘कृष्णे’चा कारभार स्वच्छ आहे. त्यामुळेच सभासदांना योग्य दर मिळाला आहे.

- डॉ. अतुल भोसले, सहकार पॅनल

कोट

प्रारंभीच्या टप्प्यात वाळवा तालुक्यात कमी पडतो की काय, असे चित्र होते. परंतु, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या भूमिकेमुळे कडेगाव तालुका आणि वाळवा तालुक्यात रयत पॅनल भक्कम होत चालल्याचे दिसत आहे.

- डॉ. इंद्रजित मोहिते, रयत पॅनल