शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

इस्लामपुरात खून; दोघांना केली अटक

By admin | Updated: February 14, 2016 00:49 IST

दोन वर्षांनी छडा : दोघांना कोठडी

इस्लामपूर : शहरातील बस स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या एका कॉम्प्लेक्समधील रत्नाकर बँकेचे ए.टी.एम. यंत्र फोडण्यास विरोध करणाऱ्या ७0 वर्षीय वृध्दाच्या झालेल्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन वर्षानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. येथील न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी दिली आहे. सुखदेव ज्ञानदेव पवार (वय ७0, रा. तडवळे, ता. शिराळा) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ७ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ही खुनाची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र महावीर खोत (वय २५ रा. इस्लामपूर), सद्दाम राजू कुमठे (वय २२, रा. इस्लामपूर) या दोघांना अटक केली आहे. यातील सलमान शेख हा तिसरा संशयित फरारी आहे. या घटनेची माहिती अशी, बस स्थानकाशेजारील कॉम्प्लेक्समध्ये सुखदेव पवार हे सुरक्षारक्षक म्हणून काम पाहात होते. २0१४ मध्ये ६ एप्रिलच्या रात्री ते ७ एप्रिलच्या पहाटेदरम्यान संशयितांनी येथील ए.टी.एम. यंत्र फोडले होते. त्यावेळी पवार यांनी विरोध केल्याने त्यांच्या डोक्यात अवजड शस्त्राने प्रहार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. या खूनाच्या घटनेनंतर एकच खळबळ उढाली होती. परंतु, पोलीसांच्या तपासाला अखेर यश आले आहे. पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षानंतर हा गुन्हा उघडकीस आला. न्यायालयाने रवींद्र खोत याला १५, तर सद्दाम कुमठे याला १७ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एल. राठोड अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)