शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

इस्लामपुरातील प्रभागांत ‘घुसखोरी’

By admin | Updated: October 7, 2016 23:50 IST

नगरपालिका निवडणूक : आनंदराव मलगुंडे-शहाजीबापू पाटील यांची एकाच ठिकाणी दावेदारी

अशोक पाटील--इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी काही प्रभाग खुले झाले आहेत. तेथे इतर प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी घुसखोरी करण्याचा डाव आखला आहे. प्रभाग १३ खुला आहे, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक शहाजी पाटील यांनी तेथून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. परंतु ओबीसी प्रवर्गातील आनंदराव मलगुंडे यांनीही या प्रभागावर दावा केला आहे.इस्लामपूरचे नगराध्यक्षपद जनतेतून निवडावयाचे आहे. त्यातच या पदाचे आरक्षण खुले झाल्याने पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. प्रभाग १३ व १४ हा विजय पाटील यांचे वर्चस्व असणारा प्रभाग असल्याने, येथून निवडून येण्यास अडचण येणार नाही, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांचेच चुलत बंधू शहाजी पाटील यांनी प्रभाग १३ मधूनच निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे.पक्षप्रतोद विजय पाटील आणि माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ११-१२ च्या राजकारणात आनंदराव मलगुंडे यांना नगराध्यक्षपद देण्यात विजय पाटील यांचाच पुढाकार होता. प्रभाग १३ मध्ये काही बदल होऊन मलगुंडे यांच्या मूळ प्रभागातील मतदारांचा प्रभाग १३ मध्ये समावेश झाला आहे. नगराध्यक्षपद ओ.बी.सी. पडले असते, तर मलगुंडे नगराध्यक्ष पदाचे दावेदार होते. परंतु आता त्यांना पुन्हा नगरसेवक पदावरच थांबावे लागणार आहे. त्यामुळेच त्यांनी विजय पाटील यांचे वर्चस्व असलेल्या प्रभाग १३ मधून पालिका निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.आधी पाहणी : नंतर निवडणूक लढविणारआम्ही दोघेही माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहोत. अण्णासाहेब डांगे हे माझे नेते आहेत. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुले झाल्यानंतर आपण प्रभाग १३ ची पाहणी करुन, येथूनच निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. मतदारांच्या याद्याही मी मिळविल्या आहेत. शहाजी पाटील यांचे नुकसान होणार नाही याची व्यवस्था करणार असल्याचे आश्वासन नगरसेवक आनंदराव मलगुंडे यांनी दिले.आमचे नेते विजयभाऊ पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे मी त्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभाग क्र. १३ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सध्या माझ्याकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाचा विचार घेतला जाणार आहे. विचारविनिमय करुन निर्णय घेऊ.- शहाजीबापू पाटील, नगरसेवक