शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात रुग्णालय फोडले

By admin | Updated: July 13, 2014 01:09 IST

आठ हजार लंपास : भरदिवसा चोरट्याचा डल्ला

इस्लामपूर : शहर आणि परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाही गाफील राहिलेल्या पोलिसांच्या निष्क्रियतेचा फायदा उठवत सराईत चोरट्याने कोल्हापूर नाक्यावरील रुग्णालय भरदिवसा फोडले. चोरट्याने स्क्रू ड्रायव्हरचा वापर करीत दुपारी पावणेदोनच्या सुमारास दरवाजा आणि ड्रॉवर उचकटून त्यातील आठ हजारांची रोकड लांबवली. चोरट्याच्या धाडसी कामगिरीनंतर या चोरीची पोलिसांच्या गुन्हे नोंदवहीत कच्ची नोंद करण्यात आली! येथील शिवपार्वती चित्रमंदिर परिसरात डॉ. गिरीष गणतपराव देशमुख (रा. विनायकनगर) यांचे रुग्णालय आहे. ८ जुलैरोजी दुपारी दीडच्या सुमारास ते केबीन बंद करून जेवणासाठी घरी गेले. त्यानंतर दहा मिनिटांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रुग्णालयाच्या खालच्या मजल्यावर असणाऱ्या सायकल दुकानदाराकडून डॉक्टरांनी स्क्रू ड्रायव्हर मागितला आहे, अशी बतावणी करीत तो घेतला.चोरट्याने वर जाऊन पहिल्यांदा केबीनचा दरवाजा उचकटला. त्यानंतर डॉक्टरांच्या टेबलच्या ड्रॉवरचे कुलूपही उचकटले आणि त्यातील आठ हजारांची रोकड ताब्यात घेतली. तेथून जाताना त्याने दुकानदाराचा स्क्रू ड्रायव्हर वरूनच दुकानात टाकला आणि दुचाकीवरून पलायन केले. डॉ. देशमुख यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्याची माहिती, वर्णन घेतले आणि हा गुन्हा तसाच वरच्यावर ठेवण्याची कामगिरी पार पाडली. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)