शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संगीता खोत यांच्या शपथपत्राची चौकशी

By admin | Updated: January 7, 2015 23:25 IST

निवडणूक आयोगाचे आदेश : महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ

मिरज : मिरजेत महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या स्वाभिमानी आघाडीच्या संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. संगीता खोत यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार पराभूत राष्ट्रवादी उमेदवार रूबाबबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत एक वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना तक्रारीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला कोणताही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी खतीब यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार पुन्हा निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयुक्त अजिज कारचे यांना तत्काळ कारवाई करून तक्रारीबाबत तातडीने अहवाल देण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. निवडणूक गैरप्रकाराबाबत आयुक्तांनी न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रूबाबबी खतीब यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीचे शपथपत्र जोडलेले होते. त्यामध्ये अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार रूबाबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. याबाबत निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना यापूर्वी तक्रारीबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी आजपर्यंत कोणताही अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी रफिक खतीब यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे राजकीय दबावामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार केली. (वार्ताहर)उच्च न्यायालयात दाद मागणार : खतीबनिवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त अजिज कारचे यांना तात्काळ कारवाईचे आदेश देऊन त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी महापालिकेला दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. महापालिका आयुक्तांनी न्याय नाही दिला तर, आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.