शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकाऱ्यांची होणार सरतपासणी

By admin | Updated: November 7, 2015 23:44 IST

जिल्हा बॅँक घोटाळा : जाधव यांच्याकडून प्रतिज्ञापत्र

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी कलम ८३ ची चौकशी अधिकारी डॉ. एस. एन. जाधव यांनी शनिवारी सध्याचे चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यावेळी जाधव यांची सरतपासणी होणार आहे. लेखापरीक्षक एस. एस. चोथे यांनी अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केले नसून, त्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी तत्कालीन लेखापरीक्षक व चौकशी अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्यासमोर आरोपपत्रावरील सुनावणी शनिवारी पार पडली. यावेळी जाधव यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये त्यांनी केलेली चौकशी, पडताळण्यात आलेली कागदपत्रे आणि नियमांचा दाखला दिला आहे. चोथे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने जाधव यांची सरतपासणी होणार आहे. जिल्हा बॅँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र यापूर्वी दाखल केले आहे. माजी संचालक, तत्कालीन अधिकारी, मृत संचालकांचे वारसदार अशा शंभरजणांचा यात समावेश आहे. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या सुनावणीवेळी तत्कालीन दोन संचालक, दोन वारसदार, एक कार्यकारी संचालक व दोन व्यवस्थापक अशा सातजणांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर म्हणणे सादर केले. नऊजण सुनावणीला गैरहजर राहिले. ८४ लोकांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ मागितली. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे आरोपपत्रावरील सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयीन आदेशानुसार कोणताही निर्णय यामध्ये घेता येणार नाही. चौकशी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सुनावणीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. यापूर्वीचे लेखापरीक्षक व चौकशी अधिकारी यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना गुंजाळ यांनी दिली होती. त्यानुसार एक प्रतिज्ञापत्र सादर झाले आहे. (प्रतिनिधी)