शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण

By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST

पृथ्वीराज चव्हाण : काँग्रेसच्या प्रचार प्रारंभात एकजुटीवर विचारमंथन

देवराष्ट्रे : लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण होत आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. राज्य सरकार चालवते, की अधिकारी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांवर हल्ले होत असून, प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंंडवडे निघाले आहेत. या व्यवस्थेला फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निवडणूक प्रचार प्रारंभप्रसंगी बोलत होते. या सरकारने जातीयवादाला खत-पाणी घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अशा व्यवस्थेमुळे वैचारिक आक्रमण वाढून लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सांगलीचे प्रभारी प्रकाश सातपुते, माजी आ. उमाजी सनमडीकर, शैलजा पाटील प्रमुख उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, असंघटित शेतकऱ्यांचा लाभ उठवत दूध व कांद्यासह शेतीमालाचे भाव पाडले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवून सर्व निधी व कार्यालये विदर्भाकडे वळविण्याचा घाट सुरू आहे. हा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्य सरकारमधील १२ दिग्गज मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोक संतप्त होऊन मोर्चे काढत आहेत. असे असताना मुख्यमंत्री पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यात दंग आहेत. खडसेंना घालवले, मग इतरांना का नाही? पतंगराव कदम म्हणाले, काँग्रगसने गट-तट बाजूला सारून एका विचाराने निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. यावेळी प्रतिक पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनीमनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील, डॉ. जितेश कदम, भीमराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, ए. डी. पाटील, पी. एम. पाटील, श्रीकांत लाड, सभापती आकांक्षा तांबेवाघ, महेंद्र लाड, सखाराम सूर्यवंशी, सुरेश मोहिते, सतीश पाटील, सुरेश शिंंदे, राजू मोरे, लता महाडिक, विठ्ठल मुळीक, विजय मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)भाषण काँग्रेसचे, साथ शिवसेनेला!खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकीचे बळ दाखवले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. अनेक नेत्यांनी भाषण काँग्रेसचे केले आणि साथ मात्र शिवसेनेला दिली. त्यांच्याबरोबर जायचे नाही आणि तिकडे गेल्याशिवाय राहायचे नाही, अशी अवस्था झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून नेत्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम जो दूर क रेल, त्याच्याबरोबर आम्ही आहे, अशी भूमिका माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.