शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वकिलाच्या जबड्यात घुसली गोळी

By admin | Updated: April 3, 2016 23:44 IST

सांगलीतील गोळीबार प्रकरण : रिव्हॉल्व्हर जप्त; संशयितास अटक

सांगली : विश्रामबाग येथील डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये शनिवारी रात्री रिव्हॉल्व्हरमधून चुकून उडालेली गोळी दीपक सदाशिव हेगडे (वय २८, रा. वारणाली गल्ली क्रमांक तीन, विश्रामबाग) यांच्या जबड्यात घुसली आहे. सहा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ही गोळी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आल्याने हेगडे यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. रिव्हॉल्व्हरचे मालक सुरेश कृष्णा गायकवाड (४०, रा. वानलेसवाडी) यांना रविवारी सकाळी विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्यांचे रिव्हॉल्व्हरही जप्त केले आहे. दीपक हेगडे व संशयित सुरेश गायकवाड यांचा परिचय नाही. ते डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये बाजार करण्यासाठी गेले होते. गायकवाड यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. ते नेहमी कमरेला लावतात. बाजार केल्यानंतर योगायोगाने दोघेही बिल देण्यासाठी काऊंटरजवळ आले होते. गायकवाड यांच्या कमरेला असलेल्या रिव्हॉल्व्हरला लॉक नव्हते. बिल देण्यासाठी ते पाकीट काढत होते. पण रिव्हॉल्व्हरच्या अडथळ्यामुळे पाकीट निघत नव्हते. त्यामुळे त्यांनी कमरेचे रिव्हॉल्व्हर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचेवळी ते जोरात खाली पडले. ट्रिगर दाबला गेल्याने एक गोळी उडाली. ती काऊंटरला धडकून शेजारीच उभ्या असलेल्या हेगडे यांच्या उजव्या गालाला लागली. हेगडे रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. त्यांना विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली. गायकवाड यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. ते टँकर व्यावसायिक आहेत. त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. पोलिसांनी त्यांचा रिव्हॉल्व्हरचा परवानाही तपासला आहे. जखमी हेगडे यांचा अद्याप जबाब झालेला नाही. याप्रकरणी हेगडे यांच्या पत्नी अश्विनी यांनी विश्रामबाग फिर्याद दिली आहे. त्यानुसार गायकवाड यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यांना न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांना ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. हेगडेंच्या जबड्यातून काढलेली गोळी तपासणीला पाठविली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सांगितले. (प्रतिनिधी) सहा तास शस्त्रक्रिया हेगडे यांची सिटीस्कॅन तपासणी व डोक्याचा एक्से-रे काढण्यात आला. यामध्ये त्यांच्या उजव्या बाजूच्या जबड्यात गोळी घुसल्याचे स्पष्ट झाले. डॉ. शरद सावंत यांनी शस्त्रक्रिया करुन जबड्यातून ही गोळी बाहेर काढली. तब्बल सहा तास शस्त्रक्रिया सुरू होती. हेगडे यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.