शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात आजपासून मुलाखती

By admin | Updated: October 22, 2016 00:03 IST

भाजपची सुरुवात : राष्ट्रवादी, काँग्रेसचीही तयारी; इच्छुकांचा भरणा

तासगाव : तासगाव नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच पक्षात निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली आहे. उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांसह सर्वांचीच जुळवाजुळव सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा श्रीगणेशा शनिवारपासून होत आहे. शनिवारी भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही मुलाखतीसाठी तयारी सुरु केली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने, उमेदवारी निश्चित करताना कसरत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी असल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे नेते खासदार संजयकाका पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागांचा स्वत: अंदाज घेतला आहे. इच्छुक उमेदवारांचा मोठा भरणा भाजपमध्ये आहे. या सर्व इच्छुकांची मते जाणून घेऊन, इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया शनिवारपासून सुरु होत आहे. शनिवारी खासदार संजयकाका पाटील यांच्या चिंचणी येथील निवासस्थानी भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. राष्ट्रवादीनेही इच्छुकांची चाचपणी पूर्ण केली आहे. शुक्रवारी रात्री आमदार सुमनताई पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे यांची तासगावात कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. सोमवारपासून राष्ट्रवादीची मुलाखत प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच काँग्रेसने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चार दिवसात दोनवेळा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. गुरुवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक झाली. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरच काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. शिवसेना, शेकाप या पक्षांतूनदेखील पॅनेल उभारण्यासाठी जुळवाजुळव केली जात आहे. एकंदरीत निवडणुकीच्या हालचाली सर्वच पक्षांत गतिमान झाल्या असून, उमेदवारीसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. (वार्ताहर) कामाला लागा : नेत्यांचे आदेश नगरपालिका निवडणुकीत इच्छुकांचा मोठा भरणा आहे. विशेषत: भाजप आणि राष्ट्रवादीत काही प्रभागात इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकाच जागेसाठी चार ते पाच इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता इच्छुकांनादेखील आहे. लवकर उमेदवारी जाहीर केल्यास, अन्य इच्छुकांची नाराजी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाला लागण्याचा कानमंत्र सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. मात्र उमेदवारीवर शिक्कामोर्तब ऐनवेळीच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.