शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आघाडीच्या निर्णयापूर्वीच इच्छुकांचा डंका

By admin | Updated: October 21, 2016 01:17 IST

सांगली-सातारा विधानपरिषद : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीही चाचपणी

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबतची चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कोणताही निर्णय झाला नसला तरी, दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या नावांचा डंका पिटला जात आहे. मतदार संघात ताकदीने कमकुवत असलेल्या भाजपनेही चमत्काराची अपेक्षा ठेवत, चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघात यापूर्वी अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत. गतवेळच्या २0१0 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील तडजोडीनंतर ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली होती. त्यामुळे याठिकाणी खटावचे माजी आमदार, नेते केशवराव पाटील यांचे जावई प्रभाकर घार्गे यांना संधी मिळाली. ज्या दोन नेत्यांमध्ये तडजोड झाली होती, त्याच नेत्यांनी आता या जागेवर पुन्हा दावेदारी सुरू केली आहे. ही जागा आता काँग्रेसलाच हवी, असे चव्हाण यांनी सांगलीत स्पष्ट केले होते, तर त्यानंतर गत आठवड्यात अजित पवारांनी, ही जागा राष्ट्रवादीचीच असल्याचा दावा केला होता. आघाडीमधील जागेचा हा संघर्ष पेटला असताना, सांगली की सातारा असाही पक्षीय संघर्ष रंगला आहे. संघर्षाच्या या वातावरणातच दोन्ही पक्षांतील इच्छुकांचा डंकाही पिटला जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचे नाव काँग्रेसकडून पुढे करण्यात आले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसा ठरावही प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविला आहे. काँग्रेसमधून मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचेही नाव चर्चेत येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी तशी मागणी केली आहे. सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आणि सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दिलीपतात्या पाटील यांनी जयंत पाटील यांच्यामार्फत ताकद लावली आहे. सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनीही प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आघाडीचे काय होणार याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी) भाजपची तयारी : प्रयत्नांना अर्थ...२००० आणि २००४ मध्ये नानासाहेब महाडिक यांनी या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून मोठी चुरस निर्माण केली होती. २००० मध्ये कॉँग्रेस नेते मदन पाटील यांच्याविरोधात २३ मतांनी, तर २००४ मध्ये विलासराव शिंदे यांच्याविरोधात ३४ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. कोणत्याही आमदार, खासदार, नेत्याचा पाठिंबा नसताना महाडिक यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केल्यामुळे याठिकाणी काहीही करता येऊ शकते, हा इतिहास आहे. त्यामुळेच या निवडणुकीसाठी भाजपने सुरू केलेली चाचपणी अर्थपूर्ण मानली जात आहे. शिवसेना, अपक्ष व आघाड्यांच्या नगरसेवकांच्या बळावर ही जागा जिंकता येण्याचा चमत्कार घडू शकतो, याची खात्री भाजप नेत्यांना आहे. असे आहे मतदारांचे गणित सांगली जिल्ह्याचे मतदान २७१ असून, त्यात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे ८३ सदस्य, सांगली जिल्हा परिषदेचे ६२, पंचायत समित्यांचे १० सभापती व जिल्ह्यातील नगरपालिकांचे ११६ पदाधिकारी व नगरसेवक यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात मतदारांची संख्या सांगली जिल्ह्याहून अधिक आहे. तेथील ३११ मतदारांमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य ६७, पंचायत समित्यांचे ११ सभापती, नगरपालिकांचे २३३ पदाधिकारी व नगरसेवक यांचा समावेश आहे. आकडेमोड सुरू मतदारांची संख्या, पक्षीय बलाबल आणि नेत्यांचा प्रभाव या सर्व गोष्टी समोर ठेवून दोन्ही कॉंग्रेसमध्ये तसेच चाचपणी करणाऱ्या भाजपमध्ये सुरू झाले आहे. त्यानंतरच पक्षीय निर्णय घेतला जाईल.