शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदी अखंडित वाहती ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

By अशोक डोंबाळे | Updated: March 15, 2024 15:58 IST

कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

सांगली : कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडण्याचे कारण काय, असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना, वारणासह सर्व धरणांमध्ये वीजनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे. वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे. पण, सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील ४७.५ टीएमसी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही. सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा १२ टीएमसी पाणी मिळणार आहे. कुठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाण्यासाठी नागरिकांचे हाल

जलसंपदा विभाग कोयना, वारणा आदी धरणांतून वीजनिर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदीत सोडत नाहीत. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील सर्व रब्बी पिके धोक्यात आली आहेत. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने करत नाहीत. सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण यांनी केला.