शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेच्या दूषित पाण्याची तपासणी

By admin | Updated: November 1, 2015 00:02 IST

महापालिकेला नोटीस देणार : ‘प्रदूषण’ अधिकाऱ्यांचा इशारा

सांगली : शेरीनाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी नदीत मिसळत असल्याने नदीतील मासेही मृत होत आहेत. याची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, याठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी ते चिपळूणला पाठविण्यात आले आहेत. नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबविण्याबाबत महापालिकेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशाराही मंडळाने दिला आहे. उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगितले की, तातडीने आम्ही नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नदी प्रदूषणप्रश्नी महापालिकेवर यापूर्वीच खटला दाखल केला आहे. तरीही या घटनेची नोंद घेऊन आम्ही तातडीने सांडपाणी रोखण्याबाबत महापालिकेला नोटीस बजावणार आहोत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नदीतील प्रदूषणाबाबत वारंवार नोटिसा बजावल्या जात असल्या तरी महापालिकेकडून त्याची दखल घेतली जात नाही. सध्या नदीत मिसळणाऱ्या शेरीनाल्याच्या पाण्यामुळे दुर्गंधीत आणि नदीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने आता बंधाऱ्याच्या पलीकडे सांडपाणी सोडण्यात येत आहे. मात्र, नदीतील प्रदूषणात वाढच होत आहे. शेरीनाल्याचे पाणी सरळ नदीत मिसळत असतानाही त्यावर उपाययोजना होत नसल्याने नदीपात्रातील पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त बनत चालले आहे. (प्रतिनिधी) मिरजेतही मासे मृत मिरज : मिरजेत कृष्णा घाटावर नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाल्याने नदीतील माश्यांचा मृत्यू झाला आहे. शहरात ुदूषित पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने नागरिक त्रस्त आहेत मिरजेत कृष्णाघाटावर नदीची पाणी पातळी खालावली असून, पाणी दूषित झाल्याने जलतरांचा मृत्यू होत आहे. हिरव्या रंगाचा दुर्गंधीयुक्त पाण्यात दोन दिवस मोठ्या प्रमाणात माश्यांचा मृत्यू झाला. नदीकाठी मृत मासे पडले असून, महापालिका आरोग्य व पाणी पुरवठा विभागाने याची दखल घेऊन स्वच्छता, साफसफाईच्या उपाययोजना राबविलेल्या नाहीत. सांगलीत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोड्यात येत आहे. यामुळे मिरजेतही दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. शहरातील विविध भागात दूषित पाणीपुरवठा होऊन नागरिकांना जुलाब व साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.